Type Here to Get Search Results !

१५ वर्षीय मुलीचा खाणीत साचलेल्या पाण्यात बुडून मृत्यु

वणी :  तालुक्यातील मोहदा गावालगत असलेल्या खदानीत आज दुपारच्या सुमारास कपडे धुण्यासाठी खदाणीवर गेलेल्या मुलीचा कपडे धुत असतांना अचानक पाण्यामध्ये पाय घसरला आणी खोल पाण्यात बुड्डु लागली. त्या मुली सोबत असलेली मुलगी घाबरली तिला काय करायचे सुचेना लगेच तिने आरडाओरडा केल्याने त्या परिसराजवळील लोक खदानी कडे धावत सुटले. मुलीचे वडील सुध्दा त्या ठिकाणी पोहचले. काही जणांनी पाण्यात उड्या मारल्या, पण त्या मुलीचा पाण्यात बुडुन मृत्यू झाला होता. सदर मुलगी ही १५ वर्षाची असून तिचे नाव विद्या अनिल आडे होते. शिरपूर पोलीसांनी घटनास्थळी धाव घेऊन, पंचनामा करून, मृतदेहाचे शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. 

Top Post Ad

🔴 BREAKING NEWS
ताज्या बातम्या थेट WhatsApp वर
📲 आत्ताच JOIN करा

Below Post Ad

file-0000000055fc81f48cd3d96f3a5119ad