Type Here to Get Search Results !

सुनिल नागपुरे यांची अमेरीकेत होणाऱ्या MDRT कॉन्फरन्स साठी निवड

वणी/प्रतिनिधी : भारतातील नं. १ ची विमा कंपनी असलेली LIC मधील वणी शाखेचे सुपरीचित विमा अभिकर्ता सुनिल शामरावजी नागपुरे यांची सलग सातव्यांदा अमेरिकेत होणाऱ्या MDRT कॉन्फरन्स साठी निवड झाली आहे. 

     सुनील नागपुरे यांनी भालर सारख्या खेडेगावातून विमा व्यवसायाला सुरूवात करून ग्राहकांना दिलेली उत्तम सेवा व नियोजन यांच्या जोरावर यश संपादन केले आहे. ग्रामीण भागातून व्यवसाय करून सलग ७ वेळा MDRT सारखा प्रतिष्ठीत बहुमान मिळविणारे सुनील नागपुरे हे वणी शाखेतील एकमेव अभिकर्ता आहे. एवढेच नव्हे तर सुनील नागपुरे यांना १५ वेळा शतकवीर होण्याचा मान देखील प्राप्त झाला आहे. 

👇श्री स्वामी समर्थ केंद्रात दत्त जयंती सप्ताह संपन्न 👇

    भारतीय जीवन विमा निगम वणी शाखेचे शाखाधिकारी अजय गेडाम, उपशाखा अधिकारी योगेश रणदिवे, विकास अधिकारी बी.बी. विटाळकर व शाखेतील अधिकारी, कर्मचारीवृंद यांनी सुनील गेडाम यांना पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आला. सुनील यांच्या यशाबद्दल संपूर्ण स्तरातून कौतुक करून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

Below Post Ad