Type Here to Get Search Results !

स्त्री' आहे म्हणून 'जग' आहे - अभिनेते अशोक शिंदे

वणी, शुभम कडू : 

                          एक महिला आयुष्यात अनेक भुमिका बजावून सुध्दा नेहमी अन्याय अत्याचाराची शिकार झालेली असते. त्यामुळे तीच्या कार्य कर्तृत्वाचा गौरव करुन तिला तीच्या क्षेत्रांत प्रोहस्ताहित करणे गरजेचे आहे. कारण स्त्री आहे म्हणुन जग आहे असं मत मराठी चित्रपट अभिनेते अशोक शिंदे यांनी व्यक्त केले. शहरातील एस. बी लॉन येथे आयोजित "सप्ततारका विक्री प्रदर्शन महिला उद्योजिका मेळाव्यात ते बोलत होते. 

          क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त 'एकच धेय्य हात माझा मदतीचा' यांच्या वतीने दर वर्षी हस्त कलेतून साकारलेल्या विवीध अलंकार, वस्त्र व गृह उपयोगी वस्तूचे प्रदर्शन व विक्री तर परिसरातील विविध महिला उद्योजिकांचा मेळावा आयोजित करण्यात येतो. या कार्यक्रमाचे हे ७ वे वर्ष असुन या  मेळाव्यास आणि प्रदर्शिनीस भेट देण्या करीता काल (दिनांक ०२ जानेवारी) रोजी सायंकाळी ०७.०० वाजता मराठी फेम अभिनेते अशोक शिंदे यांनी हजेरी लावली होती. महिला ह्या एकाच आयुष्यात विवीध भुमिका बजावून आपला संसाराचा गाडा हाकत असतात. हे खरोखर कौतुकास्पद आहे. परंतू सर्व कार्य करत असताना आपल आरोग्य आणि वैयक्तिक आयुष्य सांभाळणे तितकेच महत्वाचे असल्याचे मत शिंदे यांनी व्यक्त केले. सर्व जबाबदाऱ्या पार पाडत असताना आयुष्याचे आणि आरोग्याची काळजी म्हणुन प्रत्येकानी आरोग्य विमा काढणे महत्वाचे असल्याचा सल्ला सुध्दा आपल्या मनोगतातून व्यक्त केला. तर ह्याच सल्लाला अपेक्षित प्रतिसाद देत व्यासपीठावर उपस्थित असलेले मनसेचे नेते राजु उंबरकर यांनी प्रत्येक महिलांना आरोग्य विमा कवच देण्याची घोषणा सुध्दा यावेळी केली. 
        दिनांक ०१ ते ०३ जानेवारी दरम्यान हा मेळावा पार पडला. अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद या मेळाव्यास लाभला.  यामध्ये युवा उद्योजिका, महिला भगिनींनी सहभाग घेतला आहे. यावेळी सिने अभिनेते अशोक शिंदे यांनी संवाद साधत असताना महिला भगिनींना आरोग्य विषयक घ्यावयाची काळजी यावर मार्गदर्शन केले. बदलत्या जीवन पद्धतीनुसार जीवनात आवश्यक असणारे घटक यांना आपण प्राधान्य दिलं पाहिजे. 'स्त्री आहे म्हणून हे जग आहे' आणि  'स्त्रीची अवहेलना करू नका' असा अनमोल संदेश यावेळी अभिनेते शिंदे यांनी दिला.

        यामध्ये महिला भगिनींना आरोग्य विमा कवच उपलब्ध करून देणार असल्याची घोषणा राजू उंबरकर यांनी या कार्यक्रमादरम्यान  केली. मतदारसंघातील महिला भगिनींसाठी आजवर अनेक उपक्रम राबवत आलो आहे आणि यापुढेही राबवत राहील, महिला भगिनींचा आशीर्वाद असाच माझ्या पाठीशी राहो, असे मत उंबरकर यांनी व्यक्त केले.

              यावेळी मनसेचे पक्ष नेते राजु उंबरकर, वाहतूक सेनेने राज्य उपाध्यक्ष इर्शाद खान, नागपुर शहराध्यक्ष चंदू लाडे, महीला सेना जिल्हाध्यक्ष तथा आयोजिका अर्चना बोदाडकर, ललिता बोदकुरवार, संगिता खाडे, वैशाली तायडे, विद्या हिवरकर,  यांच्या सह मनसेचे तालुकाध्यक्ष फाल्गुन गोहोकार, अनिस सलाट, रुपेश ढोके, विलन बोदाडकर, गजानन मिलमिले, अजित शेख, शम्स सिध्दीकी, युनूस सय्यद, रोशन शिंदे यांच्यासह  साधना गोहोकार, कविता चटकी, गीतांजली माथनकर, शारदा ठाकरे, संध्या बोबडे, वंदना धगडी  सर्व आयोजक महिला व अन्य उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Below Post Ad