मारेगाव / प्रतिनिधी : चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती विजासन बुद्ध लेणी जगात प्रसिद्ध आहे. येथील लेणीत असलेल्या अखिल विश्वाला शांती, मैत्री, करुणेचा संदेश देणाऱ्या तथागत बुद्धांच्या मूर्तीची जातीयवादी समाजकंटकाकडून दि. ०१ जानेवारी २०२४ रोजी मध्यरात्री विटंबना करण्यात आली. सकाळी आंबेडकरी अनुयायांच्या ही बाब निदर्शनास येताच संताप व्यक्त करण्यात आला. या घटनेचे मारेगाव येथे पडसाद उमटून जाहीर निषेध करण्यात आला.
मारेगावचे ठाणेदार जनार्धन खंडेराव यांचे मार्फत यवतमाळ जिल्हा पोलीस अधीक्षक यांना देण्यात आलेल्या निवेदनात हेतु पुरस्पर केलेल्या विटंबनेचा तिव्र निषेध करून जातीय सलोखा बिघडवून समाजात तेढ निर्माण करून जातीय दंगली घडवून कायदा व सुव्यवस्था बिघडवणाऱ्या समाजकंटकांना तत्काळ अटक करून कठोर कारवाई व मारेगाव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला आणि बुद्ध विहाराला संरक्षण पुरविण्यात यावे मागणी करण्यात आली. यावेळी विलास रायपुरे, गजानन चंदनखेडे, ज्ञानेश्वर धोपटे, चांद बहादे, राजू बदकी, शब्बीर खान पठाण, साहेबराव नागोसे, प्राणशिल पाटील, गणेश सोयाम उपस्थिती होती.

टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या