कबड्डी हा महाराष्ट्राच्या मातीत रुजलेला, वाढलेला खेळ आहे. आज जगभरातील 40 पेक्षा अधिक देशांमध्ये कबड्डी हा खेळ खेळला जातो. ग्रामीण भागाने कबड्डीची लोकप्रियता टिकवून ठेवली असून ग्रामीण भागातच या मोठ्या प्रमाणात खेळल्या जातात. प्रो कबड्डीने हा खेळ देशातील घरोघरी पोहोचवला. त्यामुळे या खेळाला ग्लॅमर प्राप्त झाले आणि यात व्यावसायिकता आली. त्यामुळे ग्रामीण भागातील खेळाडूंनी या खेळाकडे आता करिअर म्हणून पाहायला पाहिजे. असे मनोगत रंगनाथ निधी अर्बन बँकेचे अध्यक्ष संजय खाडे यांनी केले. भालर येथील सिताई नगरी येथे कबड्डीच्या खुल्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. 31 डिसेंबर रोजी संध्याकाळी या स्पर्धेचे थाटात उद्घाटन झाले. अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना ते बोलत होते.
तीन गटात ही स्पर्धा होत असून यातील पहिला गट हा खुला पुरुष गट आहे. दुसरा गट 60 किलो पुरुष गट तर तिसरा गट हा महिलांचा आहे. खुल्या गटात पहिले बक्षिस हे 40 हजार, दुसरे बक्षिस 30 हजार, तिसरे बक्षिस 20 हजार तर चौथे बक्षिस 10 हजार रुपये आहे. 60 किलो पुरुष गटासाठी अनुक्रमे 30 हजार, 20 हजार, 15 हजार व 10 हजार तर महिला गटासाठी अनुक्रमे 20 हजार, 15 हजार, 10 हजार व 7 हजारांचे रोख बक्षिस दिले जाणार आहे. जय गुरुदेव सेवा मंडळ भालर यांच्या वतीने, बाबा बहुउद्देशीय ग्रामीण विकास संस्था भालर यांच्या सहकार्यातून व स्व. हेमंत खंगार यांच्या स्मृती प्रित्यर्थ या तुर्नामेंटचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी क्रीडा मंडळाचे सदस्य, पदाधिकारी व भालर ग्रामस्थ परिश्रम घेत आहे.



टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या