वणी, शुभम कडू :
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले
यांच्या जयंतीचे औचित्य साधुन 'एकच ध्येय हात माझा मदतीचा' यांचे विद्यमाने सप्ततारका विक्री प्रदर्शन महिला उद्योजिका मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. एक ते तीन जानेवारी पर्यंत आयोजित प्रदर्शनीकरिता मंगळवारी सिने अभिनेता अशोक शिंदे यांची उपस्थिती खास आकर्षण असणार आहे.
सप्ततारका विक्री प्रदर्शनी महिला मेळाव्याचे उदघाटन सोमवार दिनांक 1 जानेवारीला दुपारी 3 वाजता होणार आहे. आयोजित कार्यक्रमांच्या उद्घाटक सौ. तृप्ती राजु उंबरकर हे असतील तर कार्यक्रमांचे अध्यक्षस्थानी संगिता संजय खाडे असणार आहे. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणुन ललीता संजीवरेड्डी बोदकुरवार, किरण संजय देरकर, डॉ. प्रिती लोढा, डॉ. संचिता नगराळे ह्या असतील.
मंगळवार दिनांक 2 जानेवारीला सिने अभिनेता अशोक शिंदे आयोजित कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. मनसे नेते राजु उंबरकर यांच्या आग्रहास्तव ते वणी शहरात येणार आहेत. अशोक शिंदे यांनी अनेक मराठी चिञपटात प्रमुख भुमीका केल्या आहेत. त्यातच त्यांनी अलका कुबल यांचे सोबत सुध्दा सिनेसृष्टी गाजवली आहे. मंगळवारी दुपारी 4 वाजता सप्ततारका विक्री प्रदर्शनीला भेट देणार आहेत. बुधवारी दुपारी 4 वाजता मुलींची एकलनृत्य स्पर्धा दोन गटात असेल तर महिलांकरीता खुली नृत्यस्पर्धा आयोजित केली आहे.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अर्चना बोदाडकर, वंदना आवारी,गितांजली माथनकर,मिनाक्षी देरकर, साधना गोहोकार,कविता चटकी,अश्वीनी पारखी प्रयत्न करीत आहे


टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या