Type Here to Get Search Results !

मराठा सेवा संघाचा दशरात्रौत्सव ०३ जानेवारी पासुन

वणी, शुभम कडू : 

                         मराठा सेवा संघाच्या वतीने ३ जानेवारी ते १२ जानेवारी हे पर्व सावित्री - जिजाऊ दशरात्रौत्सव या नांवाने महाराष्ट्र मध्ये सर्वत्र अत्यंत उत्साहाने साजरा केल्या जात आहे. ह्याच सांस्कृतिक पर्वाच्या औचित्याने वणी शहरात विविध कार्यक्रमाचे आयोजन केल्या गेले आहे.

  या दशरात्रौत्सवाचा प्रारंभ दि.०३ जानेवारी रोज बुधवारला म्हणजेच क्रांतीज्योती,ज्ञानज्योती सावित्रीआई फुले यांच्या जयंतीदिनी होईल. जिजाऊ ब्रिगेड चे वतीने या दिवशी विराणी फंक्शन हॉल,वणी येथे सायं ६ वाजता सावित्रीआई फुले जयंती सोहळा आयोजित करण्यात आला आहे.अमरावती येथील स्त्री चळवळीच्या अभ्यासकआणि प्रख्यात वक्त्या प्रतिक्षा गुरनुले यांचे विशेष व्याख्यान संपन्न होईल.भारती राजपुत यांचे अध्यक्षतेखाली आयोजित कार्यक्रमात अतिथी म्हणुन चिखलगांव च्या सरपंच रुपाली कातकडे,लक्ष्मीनारायण नागरी सह पतसंस्थेच्या अध्यक्ष संगिता खाडे आणि माधुरी वाघमारे उपस्थित असतील.

    दि.०४ जानेवारी रोज गुरुवारला मराठा सेवा संघाचे संस्थापक पुरुषोत्तमजी खेडेकर यांचे जन्मदिनाचे निमीत्याने आणि संभाजी ब्रिगेड चे जिल्हाध्यक्ष अजय धोबे यांचे सौजन्याने ग्रामीण रुग्णालय वणी येथे फळ वितरण कार्यक्रम आयोजित आहे.

          दि.०५ जानेवारी हा सांस्कृतिक दहशतवाद मुक्ती दिन म्हणुन साजरा केल्या जातो.साहीत्य परिषदेच्या वतीने या दिवशी पुस्तक प्रकाशनाचा सोहळा विर भगतसिंग अभ्यास मंडळ,विराणी फंक्शन रोड,वणी येथे आयोजित आहे. प्रा.बाळकृष्ण राजुरकर यांचे अध्यक्षतेखाली संपन्न होणाऱ्या कार्यक्रमात प्रशांत गोखरे हे भाष्यकार म्हणुन उपस्थित असतील.तर अंबादास वागदरकर, एन.झेड. नगराळे आणि ओम ठाकुर प्रमुख पाहुणे म्हणुन राहतील.

     दि.०६ आणि ०७ जानेवारी रोज शनिवार आणि रविवारला क्रां.सा.फुले वाचनालयाचे वतीने प्रकट वाचन आणि निबंध लेखन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.स्पर्धांच्या अधिक तपशिलाकरिता ईच्छुकांनी  विठ्ठलवाडी येथील वाचनालयात संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दि. ०८,०९ व १० जानेवारीला सामुहिक जिजाऊ वंदना आणि संत तुकाराम यांचे अभंग वाचन हा उपक्रम शहरातील वेगवेगळ्या परिसरात आयोजित करण्यात आला आहे.

   दि.१२ जानेवारी ला सायं ५ वाजता जिजाऊ जयंती चा सोहळा जिजाऊ चौक,मुकुटबन रोड,चिखलगाव (वणी) येथे संपन्न होईल.प्रस्तावित सर्वच कार्यक्रमास आणि १२ जानेवारी रोजी मातृतिर्थ सिंदखेडराजा (बुलढाणा) येथे आयोजित आंतरराष्ट्रीय जिजाऊ जयंती सोहळ्यास लाखोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन मराठा सेवा संघ,संभाजी ब्रिगेड,जिजाऊ ब्रिगेड चे वतीने करण्यात आले आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

Below Post Ad