Type Here to Get Search Results !

हिट अँड रन कायदा रद्द करावा ! मनसेची जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे मागणी अन्यथा तीव्र आंदोलनचा इशारा

वणी, शुभम कडू : केंद्र सरकारने लागु केलेल्या “हिट अँड रन” कायद्या अंतर्गत दोषी आढळल्यास १० वर्षांची शिक्षा व ७ लाख रुपये दंडाची तरतूद करण्यात आली आहे. सदर कायद्याविरोधात वणी येथे महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेच्या वतीने तालुकाध्यक्ष फाल्गुन गोहोकर यांच्या नेतृत्वात लागू करण्यात आलेल्या “हिट अँड रन” कायद्याच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी आणि उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.

           अपघात घडल्यास जखमींना मृत्युच्या दारी सोडून पळून जाणे हे प्रत्येक मानवी मनाला पटण्यासारखे मुळीच नाही. परंतु स्वतःचा जीव वाचवण्यासाठी धडपड करणे हा गुण प्रत्येक प्राणी मात्रा मध्ये जन्मजात असल्या कारणाने आणि आपल्या भारत देशामध्ये दलित आणि आदिवासी यांच्यासाठी जशी कठोर कायद्याची तरतूद आहे. अशा एखाद्या कठोर कायद्याचे संरक्षण ड्रायव्हरला नसल्याकारणाने चालक हा केवळ स्वतःच्या जिवाच्या भितीने अपघात स्थळावरून पलायन करतो.
चालक सुरक्षा कायद्याची प्रथमतः अंमलबजावणी करावी व ७ लाख रु. दंड व १० वर्षे शिक्षा यामध्ये बदल करुनच कायदा लागू करण्यात यावा. अशा आशयाचे निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेच्या वतीने उपविभागीय अधिकारी आणि जिल्हाधिकाऱ्यांना  देण्यात आले. सदर कायद्यात कोणतीही सुधारणा न झाल्यास येत्या २ दिवसांत वणी उपविभागात तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल यामध्ये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवल्यास आपण सर्वस्वी जबाबदार रहाल असा इशारा फाल्गुन गोहोकर यांनी दिला.   

                           यावेळी वणी शहराध्यक्ष शिवराज पेचे, गुड्डू वैद्य, सूरज काकडे, रणजित पिंगे, मोरेश्वर कुत्तरमारे, विजय जाधव, गजानन दाडमल, विकास काकडे, राजू गोवरदीपे, राजू चिंचोलकर, रवि बोधे, अंकुश नानकटे विठ्ठल ठावरी, राकेश जुमानके, पुंडलिक अहंकारे, अधिक ठोंबरे ,राजू येरगंटीवर ,पप्पू मानकर, रोशन शिंदे आणि महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचे पदाधिकारी व मनसे सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

Below Post Ad