Type Here to Get Search Results !

निर्धार एकच – भद्रावती काँग्रेसमय!

भद्रावती : 

            आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस वरोरा–भद्रावती विधानसभा क्षेत्राच्या वतीने सेलिब्रेशन हॉल, भद्रावती येथे आढावा बैठक व कार्यकर्ती मेळावा खासदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला.

         या मेळाव्यात पक्षाची निवडणूक रणनीती, संघटनात्मक बळकटीकरण, तसेच आगामी निवडणुकांसाठीची तयारी आणि नियोजन यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. उपस्थित कार्यकर्त्यांना पक्षाच्या धोरणांची माहिती आगामी निवडणुकीत काँग्रेस पक्षाने अधिकाधिक जनतेपर्यंत पोहोचून प्रभावी प्रचार मोहीम राबवावी, असे मार्गदर्शन प्रतिभाताई धानोरकर यांनी केले.

        यावेळी आ. अभिजीत वंजारी, माजी आमदार तथा जिल्हाध्यक्ष श्री. सुभाष धोटे, श्री. अहेतशाम अली, श्री. विनयबोधी डोंगरे, श्री. भानुदास गायकवाड, श्री. प्रवीण बांदुरकर, श्री. तुळशीराम श्रीरामे, श्री. अजय गुंडावार , सौ. सरीताताई सूर यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

Below Post Ad