Type Here to Get Search Results !

वणीमध्ये भाजपचा ‘शक्तीप्रदर्शन’! शेकडो कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश, निवडणूक रणधुमाळीला सुरुवात

वणी : 

              येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीने संघटन मजबूत करण्यासाठी हालचालींना वेग दिला आहे. पक्षाचे वणी शहराध्यक्ष ॲड. निलेश माया महादेव चौधरी यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचा पाया अधिक मजबूत करण्यासाठी विविध प्रभागांमध्ये कार्यकर्त्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.

                 नुकत्याच पार पडलेल्या १८ ऑक्टोबर रोजी वसंत जिनिंग, वणी येथे आयोजित सहविचार सभा आणि नियोजन बैठकीत आगामी निवडणुकीसाठी धोरणात्मक चर्चा घेण्यात आली. या बैठकीत प्रभाग प्रभारी व प्रभाग सहप्रभारी यांची औपचारिक नियुक्ती करण्यात आली असून, प्रत्येक प्रभागातून मतदारांपर्यंत थेट पोहोचण्यासाठी कार्ययोजना तयार करण्यात आली.

            बैठकीचा विशेष आकर्षणबिंदू म्हणजे १०० महिला भगिनी आणि २५ पुरुषांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश करून पक्षाच्या शक्तीत भर घातली. पक्षप्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांना मान्यवरांच्या हस्ते पक्षाचा शेला देऊन स्वागत करण्यात आले व आगामी काळातील संघटनात्मक कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

                   या प्रसंगी माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, माजी जिल्हा अध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष तारेंद्र (भाऊ) बोर्डे, राज्य परिषद सदस्य व वरिष्ठ नेते दिनकर पावडे, माजी जिल्हा परिषद सदस्य व यवतमाळ जिल्हा कामगार आघाडी अध्यक्ष विजय पिदुरकर, माजी पंचायत समिती सभापती व जिल्हा उपाध्यक्ष संजय पिंपळशेंडे, जिल्हा उपाध्यक्ष रवी बेलुरकर व कुणाल चोरडिया, जिल्हा सचिव संतोष डंभारे, माजी नगर परिषद उपाध्यक्ष श्रीकांत प्रभाकर पोटदुखे, मा. महादेव खाडे सर, ओबीसी मोर्चा अध्यक्ष पवन राम एकरे, सोशल मीडिया अध्यक्ष दीपक शंकरराव पाऊणकर, तसेच शहर मंडळाचे सर्व पदाधिकारी, सदस्य, शक्ती केंद्र प्रमुख, बूथ प्रमुख, बूथ समिती सदस्य, विविध आघाड्या, सेल, प्रकोष्ठ आणि युवा मोर्चा पदाधिकारी अशा सुमारे ३५० कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

            बैठकीदरम्यान मान्यवरांनी आगामी निवडणुकीसाठी पक्षाच्या रणनितीबाबत मार्गदर्शन केले. कार्यकर्त्यांना मतदारांशी संपर्क वाढवण्याचे, संघटनात्मक ताकद दृढ करण्याचे आणि जनतेसमोर पक्षाच्या कार्याचे प्रभावी सादरीकरण करण्याचे आवाहन करण्यात आले.

              तसेच, १९ ऑक्टोबर ते २३ ऑक्टोबर या कालावधीत नगरसेवक व नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक व्यक्तींनी पक्षाकडे उपलब्ध अर्ज दस्तऐवजांसह भरून सादर करावेत, अशा सूचनाही देण्यात आल्या. यामुळे वणी शहरात निवडणुकीची रणधुमाळी आता अधिकच रंग घेणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

Below Post Ad