Type Here to Get Search Results !

विश्वाच्या कल्याणाची भावना हेच हिंदुत्व आहे - डॉ. प्रणाम सदावर्ते

वणी : 

         राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कामामुळे चारित्र्यवान व्यक्तींची निर्मिती होत असते. आज संघाच्या प्रेरणेने भारतासह  जगातील  विविध 60 देशात दोन लाखापेक्षा अधिक सेवा प्रकल्प सुरू आहेत. भारतीय आचार–विचार व जीवन पद्धती जगाचे मार्गदर्शक बनून कल्याण करू शकते. विश्वाच्या कल्याणाची भावना हेच हिंदुत्व आहे. असे रोखठोक प्रतिपादन सेवांकुर प्रकल्पाचे कोषाध्यक्ष डॉ. प्रणाम सदावर्ते यांनी केले. ते वणी नगरच्या विजयादशमी  उत्सवात प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. 

              या उत्सवात प्रमुख अतिथी म्हणून विदेही संत जगन्नाथ महाराज संस्थान भांडेवाडा येथील अध्यक्ष बबनराव झोलबाजी धानोरकर हे होते. व्यासपीठावर तालुका संघचालक हरिहर भागवत. व नगर संघचालक किरण बुजोने उपस्थित होते. 

           आपला विषय मांडताना डॉ. सदावर्ते म्हणाले की, आपण विजयादशमी उत्सवात शस्त्रांचे केले जाणारे पूजन हे आपल्या पराक्रमाची व शौर्याची आठवण करून देते. आज पासून 100 वर्षापूर्वी डॉ. केशव बळीरामपंत हेडगेवार यांनी भारत मातेच्या पुत्रांमधील चिंतेची न्यूनगंडतेची भावना काढून टाकून व्यक्ती निर्माणातून राष्ट्राच्या पुन: ऊत्थानाचे काम सुरू केले. या द्वारे डॉ. मी हिंदुत्वाच्या विचारांना पुनर्जागृत करण्याचे काम केले.  त्या कामाचे आज वटवृक्षात रूपांतर झाले आहे. व्यक्तीमध्ये दोष असू शकतात. त्यामुळे त्यांनी भगव्या ध्वजाला गुरुस्थानी ठेवले. 

                    संघात व्यक्ती निर्माणाचे केंद्र ही संघाची शाखा आहे. यातून निर्माण झालेल्या चारित्र्यवान स्वयंसेवकामुळे व्यवस्था परिवर्तन शक्य झाले. यातून कोणाचे अहित न करता विश्व कल्याणासाठी आपल्याला विश्वगुरु व्हायचे आहे. 

        शताब्दी वर्षात संघाने पंच परिवर्तनातून समाज परिवर्तन करण्याचे निश्चित केले आहे. यातून कुटुंब व्यवस्था बळकट करणे. नागरिकांना नागरी कर्तव्याचे पालनाचे महत्व सांगणे. पारदर्शक आर्थिक व्यवहार, पर्यावरणाचे संतुलन राखणे. सामाजिक समरसता निर्माण करणे. स्वदेशी आचरण या सर्वासाठी जागरण करण्याचे काम राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने करण्यात येत आहे. 

       या प्रसंगी पाहुण्याचा परिचय, प्रास्ताविक  नगर संघचालक किरण बुजोने यांनी केले. सांघिक गीत ॲड . प्रेमकुमार धगडी, सुभाषित शंतनु पिंपळकर अमृत वचन कृष्णकुमार पानेरी, वैयक्तिक गीत प्रवीण सातपुते यांनी सादर केले.  या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्य शिक्षक कवडू पिंपळकर यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

Below Post Ad