वाचन प्रेरणा दिनानिमित नगर वाचनालय वणी मध्ये नवीन ग्रंथ खरेदी केलेल्या ग्रंथांचे प्रदर्शन दिनांक 15 ऑक्टोबर ला आयोजित करण्यात आले. त्यासोबत युवकामध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठी वाचन सप्ताहाचे आयोजन करण्यात आले.
या ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन दलितमित्र मेघराज भंडारी यांनी केले. या प्रसंगी वाचनालयाचे उपाध्यक्ष विशाल झाडे, सचिव गजानन कासावार, संचालक हरिहर भागवत उपस्थित होते.
या प्रसंगी मेघराज भंडारी यांनी डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या जीवनावर प्रकाश टाकून त्यांचा आदर्श घ्यावा असे आवाहन केले. नगर वाचनालयात दरवर्षी वृत्तपत्र, मासिके व ग्रंथ खरेदी मोठ्या प्रमाणावर करण्यात येते. त्याचा लाभ घ्यावा अशी विनंती अध्यक्षीय भाषणात विशाल झाडे यांनी दिली.
वाचन प्रेरणा दिनानिमित दिनांक 12 ते 19 ऑक्टोबर पर्यंत दररोज 1 तास वाचन हा उपक्रम राबविण्यात आला. यात 25 महाविद्यालयातील युवक सहभागी झाले. त्यांनी या दरम्यान विविध पुस्तकांचे वाचन केले. या उपक्रमामुळे वाचनाची आवड निर्माण करण्याचा वाचनालयाचा उद्देश साध्य होईल असा विश्वास वाचनालयाचे सचिव गजानन कासावार यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन हरिहर भागवत यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी देवेंद्र भाजीपाले, प्रमोद लोणारे, राम मेंगावार, कल्पना राठोड यांनी परिश्रम घेतले.




टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या