वणी :
मारेगाव पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक उमेश खुशालराव बेसरकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'फ्रीडम फर्म' या स्वयंसेवी संस्थेकडून त्यांना माहिती मिळाली की लक्ष्मी शिसोदिया ही महिला प्रेम नगर झोपडपट्टी परिसरात देहविक्रीचा अड्डा चालविते. त्यामुळे या माहितीची खातरजमा करण्यासाठी एसडीपीओ यांच्या आदेशानुसार पोलिसांनी प्रेमनगर झोपडपट्टी परिसरात सापळा रचला. या कारवाईत एका ३० वर्षीय पंटरला आरोपीकडे पाठववून पोलिसांनी घटनास्थळी छापा टाकून लक्ष्मी शिसोदिया हिला रंगेहात पकडले. अंगझडतीदरम्यान तिच्याकडे १०० आणि २०० रुपयांच्या नोटांसह एकूण ३०० रुपये मिळाले.
या प्रकरणी लक्ष्मी शिसोदिया या आरोपी महिलेवर भारतीय दंड संहिता कलम १४३, १४४ (२) व अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायदा कलम ३, ४, ५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक गोपाल उंबरकर करत आहेत.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या