Type Here to Get Search Results !

रवी नगर लायन्स स्कूल येथे क्रांती दिन व जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा

वणी :
           शुक्रवार ( दि. ८) रोजी रवी नगर येथील लायन्स इंग्लिश मिडियम स्कूल येथे भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा महत्त्वाचा टप्पा असणाऱ्या छोडो भारत चळवळीची स्मृती म्हणून ९ ऑगस्ट क्रांती दिन व जागतिक आदिवासी दिवस साजरा करण्यात आला. तसेच अभिजात भाषा म्हणून स्थान असणाऱ्या संस्कृत भाषेचा गौरव म्हणून संस्कृत दिन तसेच सामाजिक संवेदना जपण्याच्या हेतूने स्कूलमध्ये सामाजिक रक्षाबंधन हा कार्यक्रम देखील साजरा करण्यात आला.

           प्रारंभी महापुरूषांच्या प्रतिमांचे पूजन कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य व अकॅडेमीक डायरेक्टर प्रशांत गोडे, प्रमुख अतिथी पर्यवेक्षिका मनीषा कापसे, ज्येष्ठ शिक्षिका वर्षा डांगे आणि मनीषा बेलेकार यांच्या हस्ते मालार्पण करून अभिवादन करण्यात आले. 

          शिक्षिका भारती वानखेडे यांनी देशभक्तीपर गीत सादर करून कार्यक्रमाला सुरुवात केली. विद्यार्थी नैतिक धुमणे, प्रियांश मारोडकर, आरोही कळसकर, हंसिका लांबट, स्वरा उईके, अनया दुमोरे यांनी ऑगस्ट क्रांती दिन, जागतिक आदिवासी दिवस आणि सामाजिक रक्षाबंधन यावर भाषणे दिली.

        याप्रसंगी प्रशांत गोडे यांनी क्रांतिकारकांच्या जीवनातील देशभक्तीचे अनेक प्रसंग सांगून त्यांचा जीवनपट विद्यार्थ्यांसमोर प्रभावीरित्या मांडला, तसेच क्रांती दिन व जागतिक आदिवासी दिवस का साजरा केला जातो ? पर्यावरणाचे खरे रक्षक आदिवासी लोकच असून राज्यघटनेमध्ये आदिवासींसाठी असलेल्या विविध तरतुदींचे स्पष्टीकरण दिले. 

       पर्यवेक्षिका मनीषा कापसे यांनी संस्कृत भाषेचे महत्त्व सांगून सर्वांनी संस्कृत भाषेचे अध्ययन केले पाहिजे असे आपल्या मनोगतातून विद्यार्थांना सांगितले.

       सामाजिक रक्षाबंधन या कार्यक्रमाची सुरुवात शिक्षिका डिंपल सोनकांबळे यांनी रक्षाबंधन गीत गायन करून केली. विद्यार्थीनी व महिला शिक्षकांनी प्राचार्य व अकॅडेमीक डायरेक्टर प्रशांत गोडे यांना राखी बंधली. यानंतर विद्यार्थ्यांनी सामूहिक रक्षाबंधन दिवस साजरा  केला.

       यावेळी सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे मार्गदर्शन शिक्षिका वैशाली पिसे, प्रीती बघेले, भारती वानखडे, सपना राजुरकर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार कु. परी धुळे आणि कु. पहेल चुरू यांनी केले.

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

Below Post Ad