वणी :
लायन्स क्लब वणी व वणी लायन्स चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने दिनांक १७ ऑगस्ट २०२५ रोजी रविवारी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल, देशमुखवाडी वणी येथे 'मोफत भव्य मुख कर्करोग निदान शिबिराचे' आयोजन करण्यात आले आहे. तरी वणी शहर व परिसरातील नागरिकांनी या शिबिराचा अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन वणी लायन्स चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष व माजी आमदार लायन संजीव रेड्डी बोदकुरवार, उपाध्यक्ष लायन बलदेव खुंगर, सचिव सुधीर दामले व लायन्स क्लबचे अध्यक्ष लायन तुषार नरेंद्र नगरवाला, सचिव लायन प्रा. डॉ अभिजित अणे आणि प्रकल्प संचालक लायन डॉ. विजय राठोड यांनी केले आहे.
या शिबिरामध्ये नागपूर चे सुप्रसिध्द ओरल कैंसर रोग विशेषज्ञ डॉ. चंद्रशेखर बांडे, चंद्रपूर येथील प्रसिध्द ओरल सर्जन डॉ. विजय उराडे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये डॉ. विजय राठोड, डॉ. रेशम शुगवानी, डॉ. रिषभ राठोड यांचा देखील सहभाग असणार आहे.
सदर शिबिर रविवारी सकाळी 10.00 ते दु. 1.00 वाजे पर्यंत असणार आहे. ज्या रुग्णांला तोंडात फोड येणे, तोंड न उघडणे, तोंडात पांढरे/लाल डाग, तोंडात/मानेत गाठ, तोंड/जीभ /टॉन्सिल्स मधून रक्तस्त्राव, तंबाखू/गुटखा/खर्रा सेवनामुळे होणारी हानी, सर्व कर्करोग आणि संबंधित समस्या, तोंडाच्या कर्करोगानंतर तोंड उघडण्यास असमर्थता, गिळण्यास त्रास होणे अशा प्रकारची लक्षणे असल्यास या शिबिरास अवश्य भेट देऊन निदान करावे.
इच्छुकांनी नोंदणी करण्यासाठी,(9822551113), (9822461145) व (9881487429) या क्रमांकावर संपर्क करावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या