वणी :
येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा क्रमांक सात मध्ये आज रक्षाबंधनाच्या दिवशी सर्व विद्यार्थिनी कडून राख्या कशा बनवायच्या याची कार्यशाळा घेऊन त्यांच्याकडून राख्या बनवून घेण्यात आल्या. या बनवलेल्या राख्या वर्गमित्रांना बांधून रक्षाबंधनाचा कार्यक्रम घेण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक गजानन कासावार होते. प्रमुख अतिथी म्हणून सेवानिवृत्त कॅप्टन महादेव गाताडे हे उपस्थित होते. त्यासोबत शाळेतील पदवीधर शिक्षक चंदू परेकर व ज्येष्ठ शिक्षिका शुभांगी वैद्य उपस्थित होत्या.
रक्षाबंधनाच्या निमित्ताने शाळेत सर्वप्रथम राख्यांचे कच्चे सामान आणून विद्यार्थ्यांकडून प्रत्यक्ष राख्या बनवून घेण्यात आल्या. त्यानंतर त्याच राख्या मुलींनी आपापल्या वर्गातील मुलांना बांधल्या. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शुभांगी वैद्य यांनी केले.
कॅप्टन गाताडे यांनी युद्धभूमी वरील त्यांचे विविध अनुभव सांगून आम्ही भारतीय लष्करातील जवान या देशातील बहीनी कडून येणाऱ्या राख्यांची वाट पाहत असल्याचा अनुभव सांगितला. अध्यक्षीय भाषण करतांना कासावार म्हणाले की, आपल्या देशातील प्रत्येक परंपरा व सणांना आध्यात्मिक व वैज्ञानिक महत्व आहे. आपल्याला त्याकडे डोळसपणे पाहिले तर आपल्या संस्कृतीचा आपल्याला अभिमान वाटेल. त्यामुळे आजच्या स्थितीत प्रत्येक भारतीय नागरिकांनी आपल्या देशाला आंतरबाह्य शत्रूपासून देशाचे रक्षण करण्याची गरज असल्याचे सांगितले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिगंबर ठाकरे यांनी केले. आभार प्रदर्शन आकांक्षा उईके यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मंगला पेंदोर, विजय चव्हाण यांनी परिश्रम घेतले.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या