मुकुटबन :
महाराष्ट्र शासन क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे अंतर्गत तालुका क्रीडा अधिकारी कार्यालय झरी द्वारा आयोजित तालुकास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा दिनांक 6 आगस्ट 2205 ते 8 आगस्ट 2025 या कालावधीत घेण्यात आल्या.
यामध्ये वयोगट 14, 17 ,19 वर्षाखालील मुले व मुली यांच्या कबड्डी,खो-खो ,बुद्धिबळ ,कॅरम थाळीफेक, भालाफेक , धावणे व इतर अशा अनेक स्पर्धा सरस्वती विद्यालय मुकुटबन येथील प्रांगणात आयोजित करण्यात आल्या होत्या.
यामध्ये आर्या इंटरनॅशनल स्कूल मुकुटबन च्या 14 वर्षाखालील मुले व 17 वर्षाखालील मुले यांनी कबड्डी खो-खो आणि बुद्धिबळ स्पर्धेत नाविन्यपूर्ण कामगिरी दर्शवत आपला ठसा उठविला. कुशल व जिद्दी खेळाडूंनी तालुकास्तरावरील स्पर्धेत आपली कौशल्य आणि दृढनिश्चय पुन्हा एकदा सिद्ध केला आहे.अत्यंत चुरशीच्या आणि रोमहर्षक सामन्यांमध्ये विरोधी संघाला पराभूत करून विजयाचा तुरा रोवला.
जिल्हास्तरीय स्पर्धेकरिता 17 वर्षाखालील खो खो व 14 वर्षाखालील मुले कबड्डी तसेच 14 व 17 वर्षाखालील मुले व मुली बुद्धिबळ स्पर्धेकरिता पात्र झाल्या. सर्व विजयी चमूंचे संस्थेचे संचालक मुख्याध्यापक आणि शिक्षक वृंदांनी अभिनंदन केले व जिल्हास्तरीय स्पर्धेकरिता शुभेच्छा दिल्या.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या