वणी :
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपा एकहाती सत्ता मिळवणार असे ठामपणे भाजपचे नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष ऍड. प्रफुल चव्हाण यांनी सांगितले. येथील वसंत जिनिंग हॉल मध्ये दिनांक २९ जुन रोजी संकल्प से सिद्धीतक अभियानाच्या समारोपप्रसंगी त्यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
यावेळी ओबिसी मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष श्री हंसराज अहिर, माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, माजी जिल्हाध्यक्ष तारेंद्र बोर्डे, वणी विधानसभा प्रमुख, संजय पिंपळशेंडे, माजी महामंत्री रवी बेलुरकर, जिल्हा उपाध्यक्ष नितीन वासेकर, वणी तालुका अध्यक्ष प्रदिप जेऊरकर, शहराध्यक्ष ऍड. निलेश चौधरी, माजी जिल्हा परिषद सदस्या सौ मंगलाताई पावडे, वणी तालुका अध्यक्षा मिराताई पोतराजे, जयमाला दर्वे, उमाताई पिदुरकर, संध्याताई अवताडे, मारेगाव तालुका अध्यक्ष अविनाश लांबट, झरी तालुका अध्यक्ष नागेश घुगुल,प्रा.महादेव खाडे, श्रीकांत पोटदुखे, संतोष डंभारे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.या वेळी माजी आमदार संजयरेड्डी बोदकुरवार माजी जिल्हा महामंत्री रवि बेलुरकर यांच्या नेतृत्वात व जिल्हा अध्यक्षा प्रफुल चव्हाण यांच्या उपस्थित विलास डवरे यांनी पक्षप्रवेश घेतला.
मागेल त्याला घरकुल, विशेष म्हणजे अतिक्रमण धारकांनाही घरकुल, विज, रस्ते, जलजिवन मिशन अंतर्गत हर घर नळ, लाडकी बहिण योजना अशा अनेक योजना राबविल्या, आम्ही जो शब्द दिला तो पाळला त्यामुळे जनता आमच्या पाठीशी आहे आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आम्ही एकहाती सत्ता मिळवू असे नवनिर्वाचित भाजपचे यवतमाळ जिल्हाध्यक्ष ऍड प्रफुल चव्हाण यांनी सांगितले.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या