वणी :
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पक्ष नेते राजू उंबरकर यांचा वाढदिवस दरवर्षी वणीकर जनतेसाठी खास पर्वणीच असते. वाढदिवसानिमित मतदारसंघात हितचिंतक व पक्ष सहकाऱ्यांकडून विविध उपक्रम व भव्य दिव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात येते. परंतु यावर्षी वैयक्तिक कामात व्यस्त असल्याने उंबरकर यांनी वाढदिवस साजरा न करण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना व हितचिंतकांना केले होते.
त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचे राज्य उपाध्यक्ष इरशाद खान यांनी आपल्या नेत्याचा वाढदिवस कोणताही गाजावाजा न करता, सामाजिक बांधिलकी जपत वणी शहरातील गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करून साजरा केला. त्यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
राजू उंबरकर हे नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असतात. त्यांचा वाढदिवस साजरा करताना केवळ औपचारिक सोहळ्यांना महत्त्व न देता, समाजातील वंचित घटकांना मदत करण्याचा निर्णय घेतला. या अंतर्गत, वणी शहरातील विविध शाळांमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बळ आणि गरजू विद्यार्थ्यांना शालेय दप्तरे, वह्या, पेन, पेन्सिल यांसारख्या आवश्यक शैक्षणिक वस्तूंचे वाटप करण्यात आले. याच बरोबर तालुक्यातील महाकालपूर व अन्य ठिकाणी सुद्धा जिल्हा परिषद शाळेत हे साहित्य वाटप करण्यात आले.
यावेळी बोलताना इरशाद खान यांनी, "वाढदिवस म्हणजे केवळ आनंद साजरा करण्याचा दिवस नाही, तर आपल्या समाजासाठी काहीतरी परतफेड करण्याची संधी आहे. शिक्षण हे प्रत्येक मुलाचा हक्क आहे आणि त्यांना ते मिळवून देण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत. या छोट्याशा मदतीने विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळेल, अशी मला आशा आहे," असे मत व्यक्त केले.
या उपक्रमाला विद्यार्थ्यांसह पालकांनीही भरभरून प्रतिसाद दिला. अनेक पालकांनी पक्ष नेते राजू उंबरकर यांच्या या सामाजिक कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. तर वाहतूक सेनेचे राज्य उपाध्यक्ष इरशाद खान सह मनसेच्या कार्यकर्त्यांचे त्यांनी आभार मानले. राजू उंबरकर यांच्या या उपक्रमामुळे इतरांनाही सामाजिक कार्यासाठी प्रेरणा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
यावेळी मनसेचे माजी आरोग्य सभापती धनंजय त्रिंबके, रुग्णसेवा अध्यक्ष अनिस सलाट, आजीद शेख, मयुर गेडाम,शम्स सिद्दिकी, सय्यद युनुस, गौरव पुरानकर, वैभव पुराणकर, राजा गुंतीवार, कृष्णा कुकडेजा, तर महाकालपूर येथे युवा सारंग बोथले, अतुल काकडे, संकेत वराटे, गणेश देठे, आकाश करलूके, सचिन करलूके आदी उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या