मुकुटबन :
झरीजामनी तालुक्यातील ज्ञानदा बहुद्देशीय ग्रामीण विकास संस्था मुकूटबन द्वारा संचालित आर्या इंटरनॅशनल स्कुल, मुकूटबन येथील हर्षल सुजीत नगराळे हा विद्यार्थी नवोदय परीक्षेत उत्तीर्ण झाला असून त्याची नवोदय करिता निवड झाली आहे. शाळेची दरवर्षी प्रमाणे नवोदय करिता निवड चालू असलेली परंपरा कायम ठेवण्यात शाळेला यश प्राप्त झाले.
जवाहर नवोदय समिती मार्फत नुकत्याच घेण्यात आलेल्या प्रवेश परीक्षेचा नुकताच निकाल जाहीर झाला असून त्यामध्ये हर्षल सुजीत नगराळे या विद्यार्थ्यांची नवोदयकरिता निवड झाली. संस्थेच्या सर्व संचालकांनी व मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांचे, पालकाचे,मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले. व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या