Type Here to Get Search Results !

वणी येथील दिवाणी न्यायालय, वरिष्ठ स्तर या न्यायालयाचे उद्घाटन

वणी : 

          येथे दिवाणी न्यायालयाच्या वरिष्ठ स्तर न्यायालयाचे उद्घाटन व नव्याने उभारण्यात येणाऱ्या न्यायालयीन इमारतीच्या कोनशिला स्थापनेचा समारंभ रविवार दिनांक १५ जून रोजी आयोजित करण्यात आला आहे. 

                    उद्घाटन समारंभ उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती नितीन वि. सांबरे यांच्या हस्ते पार पडणार आहे. यावेळी न्यायमूर्ती वृषाली वि. जोशी मुख्य अतिथी आणि अध्यक्षस्थानी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश नागेश वि. हवालकर हे राहणार आहेत.

                    हा समारंभ दिनांक १५ जून रोजी सकाळी १०:३० वाजता शेतकरी मंदिर, वणी या ठिकाणी होणार आहे. कार्यक्रमाचे आयोजक दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर पद्माकर एस. जोंधळे, ॲड. विरेंद्र महाजन अध्यक्ष, वणी बार असोसिएशन यांनी नागरिकांना व कायदा क्षेत्रातील सर्व घटकांना या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

Top Post Ad

🔴 BREAKING NEWS
ताज्या बातम्या थेट WhatsApp वर
📲 आत्ताच JOIN करा

Below Post Ad

image