प्रतिनिधी / वर्धा (मंगेश राऊत) :
यात विनायक साळवे व गजेंद्र सुरकार यांची राज्य प्रधान सचिव म्हणून निवड करण्यात आली. निवडी नंतर प्रथमच वर्धा शाखेला त्यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी राज्य प्रधान सचिव गजेंद्र सुरकार जिल्हाध्यक्ष बाबाराव किटे शहर शाखा अध्यक्ष अरूणभाऊ चवडे यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी विनायक साळवे यांनी जिल्हा व शहर शाखा यांच्या कार्याचा अहवाल जिल्हा कार्याध्यक्ष अरूण भोसले यांच्या कडून समजावून घेतला. सोबतच उपस्थित सदस्यांनी मनमोकळेपणाने यांनी अडी अडचणी, समस्या उपक्रम कार्यक्रम याबाबत चर्चा करून मन मोकळे केले, यावर सावळे यांनी मार्गदर्शन केले तर 2025 ते2028 या तिन वर्षासाठी राज्य कार्यकारणीत राज्य पदाधिकारी म्हणून स्थान पटकविणारे गजेंद्र सुरकार यांची राज्य प्रधान सचिव पदी, डॉ. हरिश पेटकर , सारिका डेहनकर, प्रकाश कांबळे, डॉ माधुरी झाडे यांची राज्य पदाधिकारी म्हणून वेगवेगळ्या विभागावर नेमनुक झाली.
याबद्दल या सर्वांचे विनायक साळवे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला तर वर्धा जिल्हा शाखेतील भरत कोकावार, जिल्हा प्रधान सचिव, व्दारकाताई ईमडवार महिला विभागाच्या कार्यवाह व शहर शाखेचे अध्यक्ष अरुणभाऊ चवडे यांना लक्षवेधी पुरस्कार मा. सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांच्या हस्ते सम्मान करण्यात आल्या, बद्दल त्यांचाही विनायक साळवे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अरूण भोसले यांनी केले तर आभारप्रदर्शन सुनील ढाले यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सविता लोहट,तनू वराडे, दिलीप गुळघाणे ,गजानन पखाले, पंजाब सिराम, ॲड सिराम,लोहट सर आदींनी परिश्रम घेतले.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या