वणी :
प्रहार जनशक्ती पक्षाच्या वाहतूक आघाडीच्या वणी तालुकाप्रमुख पदी मा.श्री. धनराज भाऊ भलमे आणि अल्पसंख्यक आघाडी तालुकाप्रमुख मा.श्री. रशीद भाऊ शेख यांची निवड दि. २० जूनला वणी प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाप्रमुख अनिकेत चामाटे यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले.
नामदार बच्चूभाऊ कडू यांच्या सेवा, कर्म, निष्ठा, त्याग, शेतकरी, शेतमजूर, विद्यार्थी यांच्या प्रती आदरता, विचारांचा प्रसार-प्रचार होण्याच्या दृष्टिकोनातून यांची निवड करण्यात आली आहे.
सर्वच राजकिय पक्षा पेक्षा आगळे वेगळे काम नामदार बच्चुभाऊ कडू करत असुन त्यांच्या विचाराने प्रेरित होऊन अनेक युवकांनी प्रहार मध्ये प्रवेश केला. यावेळी शहरप्रमुख प्रहार वाहन चालक संघटना सचिन राखुंडे, तालुका सचिव मुन्ना येरेकर उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या