मुकुटबन :
ज्ञानदा बहुउद्देशीय ग्रामीण विकास संस्था मुकुटबन द्वारा संचालित आर्या इंटरनॅशनल स्कुल मुकूटबन आपल्या उज्वल यशाची परंपरा कायम राखत या वर्षीही दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन करत संस्थेचे पुन्हा एकदा नावलौकिक प्राप्त केले.
उज्वल यशाची परंपरा परत एकदा कायम राखण्यात शाळेला यश
मंगळवार १३ मे २०२५ रोजी जाहीर दहाविचा निकाल जाहीर झाला. यामध्ये तालुक्यातुन सलग चौथ्यांदा प्रथम येण्याचा मान कायम राखण्यात शाळेला यश प्राप्त झाले.
यात तालुक्यातील प्रथम श्रवंत श्रीनिवास धांडेकर यास ९०.६०% , द्वितीय वैष्णवी चंद्रशेखर चिंतावर ८८.८०% , अनुश्री संदीप पेन्शनवार ८७.८०% , सिद्धी सुरेंद्र तातेड ८७.००% सार्थक रामू रामेनलावर ८५.८०% खुशी सुंरेंद्र तातेड ८४.६०% तन्वी संजय धांडे ८३.८०% सनीतरेड्डी रजनीकांत सुरकुंटवार ८२.८०% साक्षी गजानन मासाटवार ८२.४०% प्रतीक राहुल विंचू ८२.४०% योहान जयंत आडे ८२.००% इ विद्यार्थ्यांनी सर्वाधिक गुण प्राप्त केले.
आर्या स्कुलच्या विद्यार्थ्यांनी आपली दरवर्षी प्रमाणे यशाची परंपरा कायम ठेवण्यात व तालुक्यातुन प्रथम येण्याच्या बहुमानात अग्रेसर राहिली. सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे विविध स्तरातून कौतुक होत आहे. सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय संस्थेचे संचालक मंडळ, शाळेचे मुख्याध्यापक व सर्व मार्गदर्शक शिक्षकांना दिले.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या