वणी :
येथील वणी लायन्स इंग्लिश मिडी. हायस्कूलचा माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परिक्षा मार्च 2025 चा 98.64% निकाल लागला असून , यशाची परंपरा कायम ठेवली. पूर्वा प्रमोद करमनकर हिने 95.80% गुण प्राप्त करून ती शाळेतून प्रथम आली आहे.
गुणानुक्रमे पोर्णिमा ज्ञानेश्वर ताजणे (95.40) आर्या श्रीकांत निखाडे (94.80) नैतिक संदीप चीडे (94.60) सौम्य चंद्रशेखर नाटकर (94.40) तन्मय राजेश रावेकर (93.60) वेदांत संदिप जुनगरे (93.40) मुफलीया शाहिद खान (92.80) अनिकेत दिवाकर खिरटकर (92.20) अयान राजू निब्रड (92.20) वंशिका व्यंकटेश बांगडे (91.40) समृध्दी सुरेश भोयर (90.40) फैजान फिरोज खान (90.20) व उत्कर्ष राजेश मारोडकर यांनी (90.20) टक्के गुण प्राप्त केले.
52 विद्यार्थ्यांनी 75 टक्के पेक्षा अधिक गुण प्राप्त करून प्रावीण्य श्रेणीत उत्तीर्ण झाले तर 30 विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परिक्षेला एकूण 148 विद्यार्थ्यांपैकी 147 विद्यार्थी प्रविष्ट झाले तर एक विद्यार्थी अनुपस्थित राहिल्याने शाळेचा एकूण नीकाल 98.64 टक्के लागला.
शाळेचे अध्यक्ष मा. संजीवरेड्डी बोदकुरवार, उपाध्यक्ष बलदेव खुंगर, सचिव सुधीर दामले, कोषाध्यक्ष चंद्रकांत जोबनपुत्रा, सदस्य शमीम अहमद, नरेंद्रकुमार बरडिया, किशन चौधरी, महेंद्र श्रीवास्तव, राजाभाऊ पाथ्रडकर , शाळेचे अकॅडेमिक डायरेक्टर प्रशांत गोडे प्राचार्य चित्रा देशपांडे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी सर्व यशस्वी विद्यार्थी व पालकांचे अभिनंदन केले आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या