सविस्तर वृत्त असे की, सौ. सविता मनोज पवार रा. बाभुळगाव ता. सेलू जि. वर्धा या रोजमजूरी करणारी महिला व तिचा पती हे दोघेच राहतात. दोन मुली व एक मुलगा असून दोन्ही मुलीचे लग्न झाले तर मुलगा रायपुर येथे नौकरीवर आहे. दि १५ एप्रिल ला त्या झडशी टाकळी येथे पुजेचा स्वयंपाक करण्यासाठी गेले तिथे त्यांना भोवळ आली. त्या घुमू लागल्या एवढ्यात त्या मंदीरातील पुजारी भैय्यालाल बांडबैले यांनी जबरदस्तीने तिचा हात धरुन तिच्या उजव्या हाताच्या तळहातावर बंजरंग नावाने येणा-या कापराचा भलामोठा तुकडा ठेवून तो जाळला.
अशा वेळी त्या भानावर नसल्याने त्यांना जाळल्याचा त्रास जानवला नाही. मात्र शुध्धिवर येताच भंयकर वेदना सुरू होवून तळहात पुर्ण पणे सुजला त्यांनी प्रायव्हेट मध्ये उपचार घेतले. मात्र हात अधिक जखमी दोन्ही बाजूने झाल्यामुळे त्रास वाढला त्यामुळे सेवाग्राम येथे भरती होवून त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. यावेळी हि केस पोलिस स्टेशन संबंधित असल्याने पोलिसांना कळविण्यात आले पण हि महिला बेहोश असल्याने तिची मुलगी निकिता रोशन चौधरी रा.कवाळगव्हाण ता.तिवसा जि. अमरावती यांची तक्रार पोलिसांनी दाखल करवून घेतली तर होश मध्ये आल्यावर सौ. सविता मनोज पवार यांचे बयाण घेतले. त्यावर भांदवि चे कलम ३२६ या कलमा अन्तर्गत गुन्हा सेलू पोलिस स्टेशन ला दाखल करण्यात आला असे सांगण्यात आले. मात्र आज दि ८ मे पर्यंत त्याच्यावर कारवाई होवून अटक न झाल्याने सौ सविता मनोज पवार आणि मुलगा यांनी मा. पोलिस अधीक्षक वर्धा जिल्हा यांची प्रत्यक्ष भेट घेऊन तोंडी तक्रार दिली. त्यांनी सविस्तर घटना ऐकून पोलिस स्टेशन अधिकारी सेलू यांना आरोपीला त्वरित अटक करण्याचे आदेश दिले.
त्यांतर सौ सविता मनोज पवार व त्यांच्या मुलाने महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य प्रधान सचिव गजेंद्र सुरकार यांची भेट घेऊन त्यांच्या कडे तक्रार देवून न्याय मिळवून देण्यासाठी व झालेला खर्च व येणारा मोठा खर्च आरोपींकडून मिळवून त्याला कडक शिक्षा व्हावी, यासाठी प्रयत्न करावे अशी विनंती केली. यावेळी गजेंद्र सुरकार यांनी सविस्तर घटना या महिलेची पुर्वपिठीका याची माहिती त्यांना विश्वासात घेऊन त्यांचे समुपदेशन करून त्यांना सेवाग्राम येथील मानसोपचारतज्ज्ञ यांच्याकडे जाऊन उपचार घेण्यास सुचविले.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या