Type Here to Get Search Results !

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी वैज्ञानिक दृष्टिकोन महत्त्वाचा - गजेंद्र सुरकार

प्रतिनिधी /वर्धा ( मंगेश राऊत ) :

                                              विद्यार्थी हा देशाचा भावी नागरिक असतो तो चिकित्सक असतो सतत तो प्रश्न विचारतो मात्र शाळेत त्याला हाताची घडी, तोंडावर बोट,देवा सारखा चुप बस हि संस्कृती परंपरेने शिक्षण क्षेत्रात रूजली आहे. याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासावर झालेला असून विद्यार्थी अभ्यासा व्यतीरीक्त त्याच्या कडे असलेल्या व्यक्तीमत्वाला वाव देताना दिसत नाही. कारण शिक्षकच वैज्ञानिक दृष्टिकोन स्विकारणारा नसतो त्यामुळे प्रश्न विचारला कि शिक्षक मोघम उत्तर देतात. त्यामुळे विद्यार्थ्यांचे व्यक्तीमत्व विकसीत होत नाही विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारणे फार गरजेचे आहे. यातूनच पुढे वैज्ञानिक, राजकीय, उद्योजक अशा विविध क्षेत्रात विद्यार्थी योगदान देवून देशाला वैभव मिळवून देवू शकतात, असे मत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य प्रधान सचिव गजेंद्र सुरकार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना व्यक्त केले.
                 हिंगणघाट जवळील ज्ञानदा माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय सातेफळ येथे विद्यार्थ्यांसाठी व्यक्तीमत्व विकास शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी तज्ञ मार्गदर्शक म्हणून गजेंद्र सुरकार यांना निमंत्रित करण्यात आले होते. यावेळी वैज्ञानिक दृष्टिकोन आणि हसत खेळत विज्ञान या विषयावर मार्गदर्शन करताना पुढे सुरकार म्हणाले आपण विज्ञानाचा मागोवा घेतला तर इसवीसनाच्या पाच हजार वर्षा आधी भारतात वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित होता. त्यामुळे भारतात शुन्याचा शोध लागला व जगाला गणिताचे कोडे सुटले, पृथ्वी फिरते हे साॅक्रेटिस, गॅलिलिओ यांच्या आधी भारतातील लोकांना कळले तर प्राणीशास्त्र, धातु यांचा शोध घेणारे असे अनेक अनुसंधान ठोकताळे करणारे भारतात जन्माला आले. त्यात वराह मिरा,अमरजितसिंग, भास्कराचार्य असे अनेक नावे घेता येईल.
             मात्र पाच हजार वर्षा आधी उदयास आलेल्या कर्मकांडी, पुजा विधी,नवस,बळी देणे यज्ञयाग उपवास अशा अवैज्ञानिक गोष्टी समाजात रुजविण्याचे प्रयत्न पुरोहित, पुजारी,पादरी, मुल्ला मौलवी यांनी समाजात रूजवून समाजाला अंधश्रद्धेच्या गर्तात ढकलले व स्वतःचे जगणे सुरक्षित करून वैज्ञानिक दृष्टिकोन लोप पावण्याचा पुरेपुर प्रयत्न केला व आजही तो सुरूच आहे. त्यामुळे स्वतःहाच्या मनगटावर, विश्वास न ठेवता तो पप्रचलित कर्मकांडावर विश्वास ठेवून तो पारतंत्र्यात जगत आहे. त्याचा मेंदू त्याच्या कब्जात नसून तो दुस-याच्या नियंत्रणात आहे. म्हणून प्रदिप मिश्रा सारखा ढोंगी बाबा सांगतो विद्यार्थ्यांनी अभ्यास न करताही पिंडीला बेलपत्राला शहद लावून मनोभावे चिपकविल्यास पास होईल आणि उपस्थित असलेल्या लाखोंच्या संख्येने महिला पुरुष टाळ्या वाजवून दाद देतात, हे वैज्ञानिक दृष्टिकोन न रूजण्याचे उदाहरणे आहेत. वैज्ञानिक दृष्टिकोन प्रश्न विचारण्यासाठी प्रवृत्त करतो, चिकित्सक शोधक बुध्दी तयार करतो.
        त्यामुळे वैज्ञानिक, विचारवंत, निर्माण होतात. यावेळी विज्ञानाचे अनेक प्रयोग करून बुवा बाबा देवी माता पिर महाराज पाद्री फाॅदर हे यालाच कसे चमत्कार आहे. असे खोटे बोलून आर्थिक, मानसिक लैंगिक शोषणाला बळी पाडतात याचे अनेक उदाहरणे देऊन चमत्कार होत नसतात तर विज्ञान,रसायने, हातचलाखी बदमाशी वस्तू मध्ये घडामोड करुन विज्ञानाच्या युगात हे चमत्कार आहे. हे खोटे सांगून फसवितात यापासून दुर राहण्याचे आवाहन विद्यार्थ्यांना केले.
                       कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुत्रसंचालन आभारप्रदर्शन प्राचार्य लकी खिलोशिया यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

Below Post Ad