मारेगाव :
येथील श्री छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्था, वणी द्वारा संचालित स्कॉलर्स इंटरनॅशनल स्कूल CBSE आपल्या उज्वल यशाची परंपरा कायम राखून या वर्षीही दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन करत शाळेचे नावलौकिक प्राप्त केले.
दि.१३ मे रोजी दहावीचा निकाल जाहीर झाला. यामध्ये शाळेतून प्रथम मिताली पोटे हिने ९०% , द्वितीय ईश्वरी खारकर हिने ८४% तर तृतीय स्वस्तिक वासाडे ह्याने ८१% व चौथी तनिष्का पवार हिने ८१%, पाचवी सानिया मेश्राम हिने ७९%, सहावा ओम देवतळे ह्याने ७७% तर सातवी भक्ती आत्राम हिने ७७ % इ. बाकी सर्वाधिक गुण प्राप्त केले.
दरवर्षी प्रमाणे यशाची परंपरा कायम राखून विद्यार्थ्यानी विविध स्तरातून कौतुक होत आहे. सर्व यशस्वी विद्यार्थ्यानी आपल्या यशाचे श्रेय संस्थेचे सचिव मा.श्री. ओमप्रकाशजी चचडा, फार्मसी चे प्रा. नीलेशजी चचडा, शाळेचे मुख्याध्यापक श्री. मनू नायर, मार्गदर्शक शिक्षक व पालकांना दिले.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या