Type Here to Get Search Results !

वेकोलीच्या निवड प्रक्रियेत पारदर्शकता आणा - मनसेची मागणी

वणी :
             वेकोलीच्या वणी (नॉर्थ) अंतर्गत सर्व खदानींमध्ये उद्या दिनांक ०७/०३/२०२५  पासून एच.ई.एम.एम.ऑपरेटरच्या होणाऱ्या भरती प्रक्रिया व प्रशिक्षण प्रक्रियेत काही कामगार नेत्यांनी व विकोलीच्या  काही अधिकाऱ्यांनी  संगनमत करून या भरती प्रक्रियेत आर्थिक देवान घेवाण करून सावळा गोंधळ करत असल्याची तक्रार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे प्राप्त झाल्याने. या भरती प्रक्रियेत पारदर्शकता व कौशल्य निपुण उमेदवाराचीच निवड व्हावी यासाठी भरती प्रक्रिया व प्रशिक्षण हे  कॅमेऱ्याच्या समोर घ्यावेअशी मागणी मनसेने क्षेत्रीय महाप्रंबधकांस दिलेल्या निवेदनातून केली आहे.

     त्यामुळे एच.ई.एम.एम.ऑपरेटरच्या होणाऱ्या भरती प्रक्रिया व प्रशिक्षण हे कॅमेऱ्या समोर घ्यावी व यातील पारदर्शकता सिद्ध करून भरती प्रक्रियेत आर्थिक देवान घेवाण करणाऱ्या भ्रष्ट नेत्यांचा व अधिकाऱ्यांचा हा डाव हाणून  पाडावा अशी मागणी मनसेचे माजी तालुकाध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांनी या निवेदनातून वेकोली प्रशासनाकडे करण्यात आली आहे.
         असे न झाल्यास क्षेत्रीय महाप्रंबधक या आर्थिक देवान घेवाणीत महत्वाचे सूत्रधार व हिस्सेदार असल्याचे गृहीत धरून क्षेत्रीय महाप्रंबधकाच्या विरोधात वरिष्ठाकडे तक्रार करण्यात येईल. व वेकोली विरोधात तीव्र स्वरुपाचे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा या निवेदनातून देण्यात आला. यावेळी वणी मनसेचे माजी तालुकाअध्यक्ष फाल्गुन गोहोकार, संतोष राजूरकर, प्रवीण कळसकर, धीरज बगवा, सूरज काकडे, योगेश काळे, निखिल माथनकर यांच्या सह अन्य पदाधिकारी उपस्थित होते..

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

Below Post Ad