प्रतिनिधी /वर्धा (मंगेश राऊत) :
वर्धा जिल्ह्यातील सेलू व पुलगाव पोलिस स्टेशन अन्तर्गत जे वन्यजीव तस्कराचे रॅकेट सापडले व त्यांना अटक करून चौकशी नंतर न्यायालयीन कोठडी देण्यात आली त्यांच्या जवळील मोबाईल मध्ये जन्माने पायाळू असलेल्या मुला मुलींचे महिलांचे फोटो व काही संदर्भ वन अधिकारी यांना चौकशीत निष्पन्न झाले या वन्यजीव तस्करांची. कस्टडी मिळवून नरबळी दिले किंवा देण्यासाठी काही प्रयत्न झाले का त्यांची वेश्याव्यवसाय अथवा भिक मागण्यासाठी त्यांचा वापर केला आहे का हे या तस्कराकडून माहीत करून घेण्यासाठी त्यांची चौकशी करण्यात यावी यासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य प्रधान सचिव गजेंद्र सुरकार यांच्या नेतृत्वाखाली राज्य पदाधिकारी प्रकाश कांबळे जिल्हा महिला विभागाच्या सहकार्यवाह व्दारकाताई ईमडवार जिल्हा कार्यकारी समितीच्या पदाधिकारी शारदाताई झामरे यांनी पोलिस अधीक्षक मा अनुराग जैन यांची भेट घेऊन निवेदन दिले व सविस्तर चर्चा केली त्यांनी लगेच तातडीने या प्रकरणात लक्ष घालण्याचे निर्देश अधिनस्थ अधिकारी यांना दिले.
गेल्या दोन महिन्यांत मुंबई येथील स्टाॅक्स फोर्स वन विभाग वर्धा व वर्धा पोलिस यांनी मिळून मांडून साप खवल्या मांजर जे अघोरी पुजे साठी बळी देण्यासाठी वापरतात त्या तस्करीचा शोध लावून संबधीत गुन्हेगारांना अटक केली ते आज न्यायालयीन कोठडीत आहे या तपासात हे वन्यजीव तस्कराचे जाळे आठ जिल्ह्यांत व महाराष्ट्र बाहेर ही पसरले असल्याची शंका आहे अधिक तपास केला असता हे वन्यजिव तस्कर पायाळू म्हणजे जन्माच्या वेळी आधी पाय बाहेर निघून नंतर संपूर्ण शरीर बाहेर येणे होय असे अपत्य हे तंत्र मंत्र,अघोरी पुजा करणारे धन लपलेले आहे ते शोधण्यासाठी , कुटुंबात गावात काही संकट आली आहे ती दुर करण्यासाठीही अशा मुलांचा बळी देण्यासाठी वापर करतात अशा लोकांना सतत स्वप्नात धनाचा साठा लपलेला आहे असे स्वप्न पडतात असा गोड समज या तंत्र मंत्र करणा-यांचा असतो या साठी अशा मुला मुलींच्या अथवा पाळी न आलेल्या मुली यांचा शोध घेतला जातो अशी टोळी ते सुचविणारे मांत्रिक हे आजही अस्तित्वात आहे ज्यामुळे अनेक मुला मुलींच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे अशा मुला मुलींचा वेश्याव्यवसाय भिक मागण्यासाठी गैरवापर करण्या साठी होऊ शकतो यातील आरोपी या मुला मुलींच्या पळवून नेण्यासाठी सहभागी होते हे वन धिकारी यांच्या तपासात आणि आरोपीकंडे मिळालेल्या मोबाईल मधून उघडकिस आले आहे.महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादुटोणा यांना प्रतिबंध घालण्याबाबत व त्यांचे समुळ उच्चाटन करण्याबाबत अधिनियम,२०१३ या जादुटोणा विरोधी कायदा अन्तर्गत जे बारा कलम व एक उपकलम आहे त्यात ४ थ्या कलमात आणि कायद्याच्या नावातच नरबळी हा शब्द आलेला आहे व यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी येथे गावावर आलेले संकट दुर करण्यासाठी सपना नावाच्या 9 वर्षीय मुलीचा बळी देऊन तिचे रक्त पिल्या गेले तर वर्धा शहरातील आर्वी नाका परिसरातील वस्तीतील २०१४ मध्ये रूपेश नावाच्या लहान मुलाचे अपहरण करून शेतातील जमिनीत लपलेले धन मिळविण्यासाठी नरबळी दिल्याची घटना घटली असतांना या प्रकरणात पोलिसांनी जातीने लक्ष दिले पाहिजे.
नरबळी देणे किंवा देण्यासाठी प्रयत्न करने त्यात कोणत्याही कारणाने सहभागी असणे इजा पोहचविणे हा गुन्हा आहे नरबळी किंवा त्या सारख्या प्रकरणात अशा पायवर मुला मुलींचे अपहरण करून त्यांचा अघोरी पुजेसाठी कुटुंबातील अथवा गावावर आलेले संकट दुर करण्यासाठीही अथवा जमिनीतील धनाचा साठा मिळविण्यासाठी कथित काजळीवाल्यांची मदत घेवून बळी दिल्या जातो यासाठी आधी जमिनीत धन असलेल्याची समज करून घेऊन आधी मांत्रिकाचा शोध घेतला जातो नंतर काजळी वाला ज्याच्या तळहातावर मंत्राने तयार (कथित)काळा पदार्थ त्याच्या तळहातावर लावून धन कोठे आहे हे शोधल्या जाते नंतर मांत्रिक हे धन काढण्यासाठी पायाळू असलेल्या मुला मुलींचा शोध घेवून त्यांचे अपहरण करतात कारण असे अपत्य हे आप आपल्या परिसरात प्रसिद्ध असतात अनेक लोक उसण उतरविण्यासाठी यांच्या कडून लात मारून घेतात अशा बालकांना हेरून त्यांना चाॅकलेट, खाण्याचा पदार्थ पैसे याचे लालच दाखवून अथवा बळजबरीने त्यांचे अपहरण करून डांबून ठेवतात अमावस्या किंवा पोर्णिमेच्या दिवशी अशा मुलांना कथित धन लपलेले आहे अशा जागेवर किंवा पुजेसाठी निर्जन स्थानाचा शोध घेवून तिथे नेण्यात येवून त्यांची पुजा केली जाते नंतर अशा मुलांचे रक्त हे धन मागत आहे अशी उपस्थित सर्वांची समज करून देण्यात येवून या मुलांचा गळा कापून ते रक्त त्या स्थानावर शिंपडण्यात येते किंवा पितात तर अनेक वेळा कुटुंबातील किंवा गावातील संकट दुर करण्यासाठीही अशा पायाळू मुलांचा बळी दिल्या गेला असे अनेक उदाहरणे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने गेल्या ३५ वर्षात उघडकिस आणले आहे त्यामुळे या प्रकरणात कुठे बळी दिला गेला किंवा देण्यासाठी या आरोपींनी कुण्या पायाळू मुला मुलींचे अपहरण करून उपयोग केला गेला आहे का, महाराष्ट्रात कुण्या पोलिस स्टेशनमध्ये अशा लहान मुला मुलींचे मिसींग, लापता, हरविलेल्याची प्रकरणे नोंद आहे का त्यात या वन्यजीव तस्कराचे रॅकेट जबाबदार आहे का हे तपासण्यासाठी जादुटोणा विरोधी कायदा अन्तर्गत दक्षता अधिकारी म्हणून पोलिस स्टेशन अधिकारी अथवा त्या दर्जाचा अधिकारी यांची नियुक्ती केली आहे त्यांना असा काही संशय आल्यास माहिती मिळाल्यास विना वारंट तपास करण्याचा जप्ती अथवा तपास करता येतो त्यामुळे पोलिसांनी त्या दृष्टीने जादुटोणा विरोधी कायद्यात दिलेल्या अधिकाराचा उपयोग करून या प्रकरणात लक्ष घालून तपास करून छडा लावावा अशी मागणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य प्रधान सचिव व जादुटोणा विरोधी कायदा प्रचार प्रसार समितीतीचे जिल्हा कमिटीचे सदस्य गजेंद्र सुरकार यांनी पोलिस अधीक्षक अनुराग जैन यांच्या कडे केली आहे तर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कायदा विभागाचे प्रमुख ॲड. तृप्ती पाटील हे राज्याच्या गृह विभागाकडे यासाठी पाठपुरावा करीत आहे.
यासोबतच जादुटोणा विरोधी कायद्याचे प्रशिक्षण पोलिस अधिकारी, पोलिस पाटील, तंटामुक्त गाव समितीचे सदस्य पदाधिकारी यांना देण्यासाठी आदेश काढावा,करणी जादुटोणा,मुठ मारणे नरबळी आदी प्रकरणात फिर्यादी यांना सोईचे व्हावे म्हणून 2016 मध्ये पोलिस महानिरीक्षक महाराष्ट्र राज्य मा दोरजे यांनी काढलेल्या आदेशाची नोंद घेवून जिल्ह्यातील प्रत्येक पोलिस स्टेशनमध्ये अंधश्रद्धा निर्मूलन कक्ष स्थापन करण्यात यावे, यासोबतच आंतरधर्मीय आंतरजातीय विवाह करणा-या जोडप्यांना सरंक्षण देण्यासाठी मा सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य सरकारने 2024 मध्ये पत्र काढून अशा जोडप्यांना सुरक्षा प्रदान करण्यासाठी आश्रय गृह निर्माण करून त्यांना सुरक्षा पुरवावी यावरही तातडीने कार्यवाही व्हावी असेही चर्चे दरम्यान सांगून त्याबाबतचे आदेश पत्राची झेरॉक्स देण्यात आली यावरही तातडीने कार्यवाही करण्यासाठी अधिनस्थ पोलिस अधिकारी यांना त्वरीत आदेश देवून कार्यवाही करावी असे आदेश दिले.


टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या