मारेगाव :
तालुक्यातील कुंभा येथे स्वामी विवेकानंद सार्वजनिक वाचनालय कुंभा द्वारा आयोजित जागतिक महिला दिन उत्साहाने साजरा करण्यात आला. या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीमती मंगलाताई वासुदेव कोकुडे सुपरवायजर (LHV) पी. एस.सी. दहेगाव, तर प्रमुख पाहुणे सौ. वंदना श्रीकांत तांबेकर शाखा व्यवस्थापक य. जि. म. स. बँक शाखा कुंभा, डॉ. अंजली नंदकिशोर बोडेकर प्रामुख्याने उपस्थित होत्या.
सर्वप्रथम मॉसाहेब जिजाऊ तसेच सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून दिपप्रज्वलन करण्यात केले. स्वागतगीताने कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रतिभा नागभिडकर यांनी केले. प्रतीक्षा वाघ, सुनीता पांढरे यांनी महिलांना मोलाचे मार्गदर्शन केले. विविध महिलांनी गीताच्या माध्यमातून जागतिक महिला दिनाचे महत्व पटवून दिले तर प्रमुख पाहुण्यांनी महिला सक्षमीकरण, विविध योजना, आरोग्य संवर्धन, बँकांबाबत विविध बचतीचे महत्व या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले.
अध्यक्ष महोदयांनी मार्गदर्शन करतांना महिलांनी आपल्या पाल्याचे बालसंगोपन, गरोदर अवस्थेतील घेण्यात येणारी काळजी, आरोग्य बाबत माहिती दिली. त्यानंतर विविध स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेत पन्नास महिलांनी सहभाग घेतला त्यापैकी मायाताई पडोळे, बेबीताई मत्ते, मीनाताई मांदाडे, नलुताई लोनबले यांनी प्रथम, द्वितीय क्रमांक पटकाविला. यशस्वी स्पर्धकांना अध्यक्ष तथा प्रमुख पाहुण्यांचे हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.
या कार्यक्रमाचे संचालन काव्यांजली महाडोळे तर आभार बेबीताई मत्ते यांनी मानले. कार्यक्रमच्या यशस्वीतेसाठी मीनाताई मांदाडे, पपिता पडोळे, शुभांगी किनाके, गजानन कोकुडे, दिवाकर कावडे, शुभम मोहुर्ले यांनी परिश्रम घेतले.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या