वणी :
"मरावे परी कीर्ती रूपे उरावे" अशी विचारधारा असलेले वणी शिवसेना उ.बा.ठा. युवासेना वणी विधानसभा समन्वयक आयुष ठाकरे हे समाजभान जपून 20% राजकारण, 80% समाजकारण, करुन नवनवीन संकल्पनेतून गोरगरीब गरजूंना व वृद्दाश्रमांना मदत असो वा वाचनालयात विद्यार्थ्याना पुस्तके असो, असे अनेक उपक्रम दरवर्षी वाढदिवसानिमित्य ते राबवून मदत करीत असतात.
त्याप्रमानेच आयुष यांनी यावर्षी सुध्दा अपंग निवासी कर्मशाळा वणी येथे विद्यार्थांना टॉवेल व खाद्यसाहित्य भेट देऊन, त्यांच्या सोबत केक कापून वाढदिवस साजरा केला. त्यावेळी विद्यार्थ्याच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता.
यावेळी धनोजे कुणबी समाज वणीचे अध्यक्ष मंगेश रासेकर, शिवेसेनेचे जेष्ठ नेते दीपक कोकास, गणपत लेडांगे, रवी बोढेकर, सुरज पिदुरकर, प्रशांत खारकर उपसरपंच ग्रामपंचायत गणेशपुर उपस्थित होते. शिक्षक श्री. किंगरे सर यांनी उपस्थितांचे आभार मानले.




टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या