Type Here to Get Search Results !

अंधश्रद्धा म्हणजे अंधार तर विज्ञान म्हणजे प्रकाश - गजेंद्र सुरकार

प्रतिनिधी / वर्धा (मंगेश राऊत) : 
                       
        उत्क्रांतीच्या अखेरीस होमो शेपीयन म्हणजे शस्राचा वापर करणारा हुशार माणूस जन्माला अखेरीस सर्व प्राणी पक्षी वनस्पती किटक यांच्या नंतर आला. आज या माणसाला होमो शेपीयन शेपीयन म्हणजे अती हुशार माणूस म्हणतात या हुशार माणसातूनच भारतात प्रथमच शुन्याचा शोध भास्कराचार्य  तर आर्यभट्ट ने पृथ्वी गोल आहे.  ती फिरते हे सर्वात आधी सांगितले अमरजितसिंग यांनी प्राणीशास्त्राचा शोध लावला मात्र याचा सिध्दांत माडण्यास कमी पडले युरोपात ब्रूनो, साॅक्रेटीस, गॅलिलिओ यांनी पृथ्वी गोल आहे व ती कार्यकारणभावाने बध्द आहे हे सांगण्याचा प्रयत्न केला. त्यांना देहदंडाची शिक्षा भोगावी लागली म्हणजेच माणूस हा जिज्ञासू, प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी प्रयत्न करणारा प्रयोग करणारा होता. 
       याचा अर्थ विज्ञानाचा अभ्यास उपयोग तो जिवणात करत होता मात्र पाच हजार वर्षांपूर्वी आलेल्या धर्म संस्कृतीने यज्ञ याग पुजा विधी, याविषयी मन गढंत गोष्टी सांगून, पाप पुण्य, स्वर्ग नरक याची भिती दाखवून लोकांना भिती दाखविली. त्यामुळे ज्या अनाकलनीय गोष्टी माणसाला कळल्या नाही त्याचा कार्यकारणभाव तपासुनच पाहिला नाही. अशा गोष्टींना भुत प्रेत, आत्मा, पिशाच्च, चकवा, लावडीण, करणी जादुटोणा, भानामती, कुत्र्यांचे भुंकणे मांजर आडवी जाणे ज्योतिष, मंगळ, कुंडली ग्रह तारे इत्यादिंचा मानवी जिवनात हस्तक्षेप होतो. यावर विश्वास ठेवून अंधश्रद्धेच्या आहारी जाऊन आपला विवेक गमावून बसला. मात्र आज तो मोबाईल, गिजर, ऐसी, मोटरसायकल कार, फ्रिज , फॅन, लॅपटॉप या सारख्या विज्ञान तंत्रज्ञान याचा वापर करून वस्तू बनवून त्याचा वापर दैनंदिन जीवनात करू लागला. मात्र तो अजूनही समजू शकला नाही अंधश्रद्धा म्हणजे अंधार तर विज्ञान म्हणजे प्रकाश होय दोन्ही सोबत घेऊन तो जगू शकत नाही. असे स्पष्ट मत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य प्रधान सचिव गजेंद्र सुरकार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना केले.

      एस.जे.ऐ.एन.महाविद्यालय देवळी यांच्या प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय सेवा योजना शिबीराचे आयोजन सालोड जवळील पडेगाव येथे आयोजित करण्यात आले होते. यावेळी अंधश्रद्धा निर्मूलन आणि विवेक यावर मार्गदर्शन करण्यासाठी तज्ञ मार्गदर्शक म्हणून गजेंद्र सुरकार यांना पाचारण करण्यात आले होते. याप्रसंगी मंचावर शिबीर संयोजक डॉ प्रा. रफिक शेख  प्रा किरण पावणे, निलेश गोंडे समितीच्या अंधश्रद्धा निर्मूलन पत्रिकेच्या जिल्हा कार्यवाह रजनी सुरकार प्रामुख्याने उपस्थित होते. पुढील सत्रात बुवाबाजी आणी चमत्कार यावर बोलताना कुंभमेळ्यात एक तरूण सुंदर दिसणारी किन्नर नागा साध्वी आपल्या मंडपात चमत्कारिक पणे लाकडांना आपोआप लाग लावतांना दिसते तर तीच साध्वी पटांगणात लाकडांना आग पेटीतील काडी उगाळून आग लावताना दोन्ही बाबी व्हायरल होत आहे.
           त्याबाबत कोणालाही प्रश्न पडला नाही आपोआप आग लागते तेव्हा पिवळा फाॅस्परस किंवा पोट्याशियम परमॅगनेट व ग्लिसरीन यांचे मिश्रण वापरलेल असते बाहेर ते करता येत नाही. यावरून चमत्कार करणारे सर्वच बाबा देवी माता पिर हे भोंदूगिरी करणारे असतात याप्रसंगी अनेक चमत्काराचे सादरीकरण करून त्याचा फोलपणा समजावून सांगत कोणीही चमत्कार करू शकत नाही जो करतो त्यामागे दैवी शक्ती, तंत्र मंत्र, अघोरी विद्या नाही तर विज्ञान, हातचलाखी, वस्तूत घडामोड रसायनांचा वापर केला जातो हे लक्षात घ्यायला पाहिजे 
       कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुत्रसंचालन आभारप्रदर्शन करीना संजय शिरपुरकर हिने केले कार्यक्रमास गावातील महिला पुरुष,शिबिरार्थी विद्यार्थी, प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

Below Post Ad