वणी :
स्वराज्य निर्माता छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव दिनांक 19 फेब्रुवारी हा सर्व जगभर मोठ्या उत्साहात साजरा होत असतो यानिमित्ताने शिवा महोत्सव समिती मोहदा तथा संभाजी ब्रिगेड मोहदा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मोहदा तालुका वणी येथे भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे.
या दोन दिवसीय कार्यक्रमध्ये दिनांक 19 फेब्रुवारीला सकाळी ०६:०० ते ०८:०० ग्राम स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे. तसेच सायंकाळी ०६:०० ते १०:०० या वेळामध्ये गावात भव्य शोभा यात्रेचे आयोजन करण्यात आलेले आहे. त्याच पद्धतीने दुसरे दिवशी दि. २० ला सर्व धर्मीय सामूहिक विवाह मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. त्याचप्रमाणे नवनिर्वाचित खासदार माननीय प्रतिभाताई धानोरकर व नवनिर्वाचित आमदार माननीय संजय भाऊ दरेकर यांचा जाहीर सत्कार या कार्यक्रमांमध्ये घेण्यात येणार आहे. यवतमाळ येथील प्रसिद्ध विचारवंत लेखक माननीय नंदू भाऊ बुटे यांचे यावेळी व्याख्यान आयोजित केलेले आहे. त्याचप्रमाणे मोदा प्रीमियम लीग चे उद्घाटन यावेळी ठेवण्यात आलेले आहे.
या सर्व उपक्रमासाठी संभाजी ब्रिगेड वणी तालुकाध्यक्ष तथा शिवमहोत्सव समितीचे अध्यक्ष श्री. गणेश बोंडे सचिव, श्री. अमोल शेलवडे, उपाध्यक्ष श्री. वैभव मडावी, सदस्य अमोल पुनवटकर, रमण मेश्राम, मण कुचनकर, श्रीकांत देठे, विनीत कुचनकर, स्वप्नील बोथले, रुपेश खुसपुरे, आशिष शेलवडे, विशाल कुचनकर, खलील शेंख यासह सर्व ग्रामवाशी परिश्रम घेत आहे.




टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या