वणी :
येथिल एक शाखीय तेली समाजाच्या वतीने हनुमान मंदिर जत्रा मैदान वणी येथे संत संताजी जगनाडे महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष रवी बेलुरकर तर प्रमुख पाहुणे विदर्भ तेली महासंघाचे तालुकाध्यक्ष संतोष डंभारे, विजय पिपराडे, राजू लीचोडे, विशाल ठोंबरे, राजू पाटील, बाबाराव खांदनकर, उपस्थित होते.
संताजीच्या प्रतिमेला हार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. समाज हिताच्या दृष्टीने व समाजातील सर्व समाज बांधवांना एकत्रित आणून सामाजिक कार्य करण्याची अतिशय नितांत गरज आहे, असे मनोगत प्रमुख उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.
यावेळी समाजातील अविनाश पाटील, कैलास पिपराडे, देवेंद्र गोबाडे, रमेश पाटील, आशिष डंभारे, वसंता लाडे, विनोद नीत, संतोष पुंड, गुनवंत गोल्हर, सचिन पाटील, वसंता डवरे, आकाश क्षीरसागर, दिपक पाऊनकर, दिनेश पाऊनकर, गणेश पडोळे, राजु पारोघी, नयन डंभारे, महेश पिपराडे, नागेश राडे, रवि राडे, अजय पारधी, अविनाश राळे,सुरज पारधी, सतीश नीत, विठ्ठल डुकरे, आकाश उपाध्ये, राहुल उपाध्ये, प्रशांत पाटील, जितेंद्र पाउनकर, आकाश पाटील, सचिन पारटकर, दिपक ठोंबरे, रोहित ठोंबरे या प्रमुख उपस्थिती सह समाजबांधव प्रामुख्याने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजू लिचोडे, सूत्रसंचालन व आभार गजानन पाटील यांनी केले.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या