Type Here to Get Search Results !

संजय देरकर यांनी आमदार म्हणून घेतली शपथ

वणी : 

        महाराष्ट्र विधानसभेचे तीन दिवसीय विशेष अधिवेशन कालपासून सुरू झाले. अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विरोधी महाविकास आघाडीच्या सदस्यांनी आमदार म्हणून शपथ घेतली. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी (शनिवारी) राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी आमदार म्हणून शपथ घेतली.

        विधानसभेचे प्रोटेम स्पीकर कालिदास कोळंबकर यांनी सर्वांना आमदार म्हणून शपथ दिली. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी नुकत्याच झालेल्या राज्य निवडणुकीत ईव्हीएमचा गैरवापर झाल्याचा आरोप करत विरोधी सदस्यांनी शपथविधी सोहळ्यावर बहिष्कार टाकला होता. मात्र, सर्व विजयी सदस्यांनी आज म्हणजेच रविवारी आमदार म्हणून शपथ घेतली.

      वणी विधानसभा क्षेत्राचे शिवसेनेचे (UBT) आमदार संजय देरकर यांनी शपथविधीपूर्वी मातोश्री येथे जाऊन हिंदुहृदयम्राट बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करून आशीर्वाद घेतला. यानंतर महाराष्ट्र विधानसभा अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी आमदार म्हणून शपथ घेतली. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

Below Post Ad