प्रतिनिधी/ वर्धा (मंगेश राऊत) :
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक शहिद डॉ नरेंद्र दाभोळकर यांच्या १ नोव्हेंबर या जन्मदिनाच्या निमित्ताने व दिपावलीच्या निमित्त नगर परिषदे व्दारा जुन्या वास्तूत संचालित निराधारांच्या वृध्दाश्रमात आणि रेल्वेस्टेशन परिसरात,स्थानिक महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या जिल्हा व शहर शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने दिवाळी फराळाचे वाटप करण्यात आले.
दिवाळीच्या दिवशी अनेक लोक मिष्ठान्न व दिवाळीत आपण घरी करून अनेक त-हेचे खाद्य पदार्थ बनवून खातो मित्र मंडळी, नातेवाईक यांना आग्रहाने खावू घालतो. मात्र याच वेळी अनेक गरीब कुटूंब, रस्त्यावर भिक मागणारे,अंध अपंग व्यक्ती, निराधार व्यक्ती रस्त्याच्या आडोशाने झोपलेले असतात ते या दिवशी उपाशी किंवा या मिष्ठान्नापासून दुर असतात. समाज याची दखल घेत नाही, तर हजारो रुपयांचे फटाके फोडून पैशांची बरबादी क्षणात करतात. मात्र तोच पैसा वाचवून अशा लोकांना मिष्ठान्न वा फराळाच्या वस्तू द्याव्यात त्यांच्याही जिवणात यानिमित्ताने आनंद आणावा असे वाटत नाही. तसेच वृध्दाश्रमात अनेक वृध्द महिला पुरुष आपले हक्काचे घर सोडून अनेक कौटुंबिक कलहामुळे नाईलाजास्तव वास्तव्यास आहेत. अशा लोकांच्या जिवणात काही क्षणाचा आनंद देण्याचा प्रयत्न म्हणून शहिद डॉ नरेंद्र दाभोळकर यांच्या जन्मदिनाचे व दिवाळीचे औचित्य साधून फराळवाटपाचा व आरोग्य विषयक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
राज्य प्रधान सचिव गजेंद्र सुरकार यांच्या अध्यक्षतेखाली व डॉ मिरगे यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम पार पडला. याप्रसंगी वैज्ञानिक जाणिवा व शिक्षण प्रशिक्षण विभागाचे राज्य सहकार्यवाह प्रकाश कांबळे यांनी स्वतःहाचे आरोग्य कसे ठणठणीत ठेवावे. या विषयी माहिती दिली डॉ मिरगे यांनी अनेक प्रकारचे वृध्दापकाळात होणारे आजार कसे दुर ठेवता येईल हे सविस्तर सांगून व्यायामाचे फायदे सांगितले. सुत्रसंचालन जिल्हा प्रधान सचिव सुनील ढाले आभारप्रदर्शन विविध उपक्रम विभागाचे कार्यवाह निखिल जवादे कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रसन्ना कांबळे,सिमा पाटील, रजनी सुरकार यांनी परिश्रम घेतले. वृध्दाश्रमाच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला वृध्दाश्रमातील वृध्द महिला पुरुष सहभागी झाले.


टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या