प्रतिनिधी /कोरा(मंगेश राऊत ) :
जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा खापरीने एका वर्षात चमत्कार घडविला एक-दोन नव्हे तब्बल ९० लक्ष्यांची शैक्षणिक भौतिक सुविधा उपलब्ध करून दिली आधुनिक युगात शिक्षणासाठी व विद्यार्थ्यांसाठी लागणाऱ्या सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून घेण्याचा मानस येथील मुख्याध्यापक पुरुषोत्तम बावने यांनी केला.
२०२३ ला मुख्याध्यापक बावने रुजू होताच शाळेचा व विद्यार्थ्यांचा चेहरा मोहरा बदलण्याचा प्रयत्न सुरू केला प्रथमतः गावातील लोकांना गोळा करून शाळेचे व शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले व सुरुवातीलाच गावातून तीन लाखाची देणगी निर्माण केली तिथेच न थांबता खापरी ग्रामपंचायतचे सरपंच देविदास दोडके व सचिव भोमले यांनी जिल्हा परिषद शाळेला सोलर संच, पाण्याची व्यवस्था, रंगरंगोटी व बजाज फाउंडेशनला निधी उपलब्ध करून दिला.
भूपेंद्रजी शहाणे व्यवस्थापक पी व्ही टेक्स्टाईल जाम यांनी सी.एस.आर. निधी उपलब्ध करून दिला आणि महत्त्वाचे आमदार समीर कुणावार यांनी ६४ लाख रुपये निधी उपलब्ध करून दिला. तसेच मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा यातून पाच लाख रुपये निधी उपलब्ध झाला या सर्वांकरिता कृतज्ञता व लोकार्पण सोहळा संपन्न करण्यात आला होता.
कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी भूपेंद्रजी शहाणे यांनी आपल्या मार्गदर्शनात शाळेला व विद्यार्थ्यांना कुठल्याही प्रकारची गरज भासल्यास आम्ही सदैव तयार असू असे आश्वासन दिले आमदार समीर कुणावर यांनी आपल्या उद्घाटनिय भाषणात आपली खरी संपत्ती पैसा घर शेती दागिने ही नसून आपली मुले व युवा पिढी आहे म्हणून याकरिता आपण शाळेसाठी मुलांसाठी युवा पिढीसाठी जेव्हा जेव्हा जीजी मदत लागेल ती करण्यास कटिबद्ध असू असे सांगून जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा खापरीला दत्तकही घेतली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष रुपेश गाऊत्रे, विशेष अतिथी रोशन कुमार दुबे, प्रमुख अतिथी रोशन चौखे, देविदास दोडके, अशोकराव गीद्देवार, बारसाकडे, विनोद पालवे, नेवल ताई, कारमोरे ताई, वसंता घुमडे, किशोर नेवल, अरुण चौधरी,सुजाता बावणे,शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामपंचायत सदस्य,समस्त खापरी व परिसरातील ग्रामवासी सर्व चिमुकले विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रस्ताविक पुरुषोत्तम बावने संचालन खेकारे सर तर आभार प्रदर्शन काकडे सर यांनी केले.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या