वणी :
शहरातील सिध्दार्थ वसतीगृह वणी येथे दि. ०४ आक्टोंबर रोजी पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष प्रा.पुरुषोत्तम पाटील तर प्रमुख, पाहुणे म्हणून सरचिटणीस यवतमाळ जिल्हा कॉंग्रेस कमिटी संजय खाडे, प्राचार्य डॉ. शंकरराव वह्राटे, संस्थेचे उपाध्यक्ष प्रा.एस.एस.सोनारखण, सचिव नवनाथ नगराळे, सहसचिव प्रा. बाळकृष्ण राजूरकर, कोषाध्यक्ष जगदिश भगत, संचालक डि.एन.कांबळे, भाऊराव मजगवळी, पदाधिकारी व पालक वर्ग आणि विद्यार्थी उपस्थित होते.
सर्व प्रथम भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या फोटोंची पुजा करून मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. प्रमुख पाहुणे प्राचार्य डॉ. शंकर व-हाटे यांनी मनोगत व्यक्त केले.
सत्कारमुर्ती संजय खाडे यांना शाल व श्रीफळ व डॉ. बाबासाहेब आंबेडकर व द्वितिय महायुद्ध हे पुस्तक भेट देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना संजय खाडे यांनी सांगितले की, ''शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा'' या बाबासाहेबांच्या कोटेशनची आठवण करून दिली. त्याच प्रमाणे शिक्षण घेऊन डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे स्वप्न पूर्ण करावे असे मोलाचे मार्गदर्शन केले. त्या वेळी वसतिगृहातील मुलांना झोपण्यासाठी २४ बेड दान देण्याचे वचन दिले.
त्याचप्रमाणे संस्थेचे उपाध्यक्ष एस.एम.सोनारखन यांनी वसतिगृहाला १०,०००/(दहा हजार) रुपये तर सहसचिव प्रा.बा.ग.राजूरकर यांनी ११,०००/ (अकरा) हजार रुपये मदत दिली. त्या प्रसंगी त्यांचा सत्कार करण्यात आला. संस्थेचे दिवंगत सदस्य ॲड. अशोक मानकर यांनी सुद्धा आर्थिक मदत केल्यामुळे छब्बूताई मानकर यांचा साडी चोळी व पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला.
त्यानंतर संस्थेचे अध्यक्ष प्रा. पुरूषोत्तम पाटील यांनी वसतिगृह हे खानावळ नसुन ते मुलांवर संस्कार घडविण्याचे केंद्र आहे, असे मत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचिव नवनाथ नगराळे तर संचालन व आभार प्रदर्शन अधिक्षक मंगल तेलंग यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सेवक कैलास वडस्कर व गुलाब भोयर यांनी सहकार्य केले.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या