Type Here to Get Search Results !

लायन्स स्कूल येथे महात्मा गांधी व शास्त्री जयंती साजरी

वणी :   

    येथील लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल येथे लायन्स क्लब व लायन्स चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली. शाळेचे अध्यक्ष तथा वणी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार व लायन्स क्लब चे अध्यक्ष राजाभाऊ पाथ्रडकर यांचे हस्ते प्रतिमांचे पूजन व हारार्पण करून अभिवादन करण्यात आले. 

           यावेळी पाहुण्यांसह विद्यार्थी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी 'स्वच्छतेची शपथ' घेतली. तसेच लायन्स क्लब इंटरनॅशनल च्या 'मानवता सेवा सप्ताहा' अंतर्गत विद्यार्थ्यांनी म. गांधीजी व शास्त्रींची प्रसिद्ध वचने व घोषवाक्यांचे फलक घेऊन शालेय परिसरात 'शांतता फेरीचे' आयोजन करुन 'मानवता -बंधूभाव व सार्वजनिक स्वच्छतेचा' संदेश दिला.

    कार्यक्रमाला लायन्स क्लब चे सचीव लायन किशन चौधरी, सदस्य महेन्द्र श्रीवास्तवा, शाळेचे अकॅडमीक डायरेक्टर प्रशांत गोडे प्राचार्य चित्रा देशपांडे, पर्यवेक्षक, विद्यार्थी व शिक्षक कर्मचारी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

Below Post Ad