वणी प्रक्षेत्र खाजगी शालेय कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्या. च्या धनोजे कुणबी सभागृहात आयोजित वार्षिक आमसभेत कु.एंजल सुनिल गेडाम हिचा जाहीर सत्कार करण्यात आला. एंजल हिने महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परिक्षेत मुंबई बोर्डात नैपुण्य प्राप्त केले. एंजल हि राजर्षि शाहु महाराज हिंदी विद्यालय येथील प्रयोगशाळा कर्मचारी व पतसंस्थेचे सभासद सुनिल गेडाम यांची मुलगी आहे. संस्थेच्या आमसभेत संस्थेचे अध्यक्ष मा. दिलीप पेचे व सचिव भिमराव तेलंग यांचे हस्ते गौरवचिन्ह व बक्षिस प्रदान करून गौरविण्यात आले. यावेळी संचालक मंडळ व सभासद बहुसंख्येने उपस्थित होते. एंजल हिने यावेळी आपल्या यशाचे श्रेय आई वडीलांना दिले.
एंजल गेडाम हिचा वणी प्रक्षेत्र खाजगी शालेय कर्मचारी सहकारी पतसंस्थेकडून सत्कार
0
वणी :
Tags
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या