मारेगांव :
येथील स्कॉलर्स इंटरनॅशनल CBSE स्कूल तर्फे म. गांधी जयंतीनिमित्त मानवी साखळी आयोजित करण्यात आला होती. सुरवातीला शाळेतील प्राचार्य यांनी म.गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून स्वच्छते वर मार्गदर्शन केले. नंतर मानवी साखळी साठी निघाले. ही मानवी साखळी मार्डी चौक ते आंबेडकर चौक पर्यंत बनवली होती. ह्या मानवी साखळी मध्ये शाळेतील संपूर्ण विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. काही विद्यार्थी यांनी म.गांधी विषयी आपले मत मांडले. व काही विद्यार्थ्यानी स्वच्छते चा विषय घेऊन स्वच्छतेचा परिपक्व अभ्यास सादर केला. शाळेतील प्राचार्य, शिक्षकांनी स्वच्छतेची जनजागृती करून स्वच्छतेचे धडे दिले. तसेच मानवी साखळी चे महत्व सांगून हया मानवी साखळी चा समारोप करण्यात आला. ह्या मानवी साखळी ला विदयार्थी, शिक्षक तसेच प्राचार्य यांनी सहभाग दर्शविला.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या