वणी :
वणी शहर काँग्रेस व सेवादल काँग्रेस तर्फे राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी प्रमुख उपस्थित माजी आमदार वामनराव कासावार यांनी गांधीजी पुतळ्याला व लालबहाद्दूर शास्त्री यांच्या तैल चित्राला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. महात्मा गांधी यांनी देशाला स्वातंत्र्य मिळून देण्यात त्यांचे मोलाचे योगदान होते. अहींसा पर्मो धर्माचा मार्ग अवलंबून अहिंसक मार्गाने संप चालविला सत्याग्रह आणि असहकार या अहिंसक शस्त्रांची शक्ती लोकांना पटू लागली व चळवळ पुढे नेली.
जयंतीनिमित्य त्या परिसरातील साफसफाई करण्यात आली. या अभिवादन कार्यक्रमाला उपस्थित शहराध्यक्ष महेंद्र लोढा, घनश्याम पवाडे तालुकाध्यक्ष, सौ.संध्या बोबडे जिल्हाध्यक्ष, प्रमोद लोणारे सेवादल शहराध्यक्ष, महीला शहराध्यक्षा शामा तोटावार, संजय खाडे, टीकाराम कोंगरे, ओम ठाकूर, राजाभाऊ पाथ्रडकर, अशोक पांडे, मोरेश्वर पावडे, प्रमोद वासेकर, सुरेश बनसोड, विकेष पानघाटे, रवी कोटावार, महादेव दोडके, ईश्वर खाडे, अनंतलाल चौधरी, विवेकानंद मांडवकर, शरद मंथनवार, अफसर शेख, अशोक नागभिडकर, रमेश बिलोरीया, दिनेश पाऊनकर, नीलिमा काळे, किरण कुत्तरमारे, दर्शना पाटील, प्रिया मडावी, ज्योती मेश्राम इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या