Type Here to Get Search Results !

महाराष्ट्र अनिसचे प्रबोधन...अन भानामती थांबली...

प्रतिनिधी/ वर्धा (मंगेश राऊत) : 

                           1609 ला ख-या अर्थाने जगाला गॅलिलिओ यांच्या प्रयत्नामुळे विज्ञानाचा प्रकाश मिळाला तर मानव जन्म ते उत्क्रांती असा मोठा पल्ला त्याला पडलेल्या प्रश्नाची उत्तरे निरीक्षण तर्क अनुमान प्रयोग प्रचिती याव्दारे स्वकष्टाने मिळवून विज्ञान, तंत्रज्ञान यामध्ये मोठी भरारी घेत 25 हजार च्यावर मानवी पिढ्या नष्ट झाल्या त्यातून मानवी जिवण उल्हासी, सुखवस्तू झाले तरी आजही अनेक प्रश्न सुटायचे राहले यातूनच भुत,आत्मा,लावडीन,चकवा,पाप,पुण्य,स्वर्ग नर्क,पुजा पाठ,रूढी परंपरा, अघोरी प्रथा परंपरा,नरबळी,नवस, यज्ञयाग तर भानामती सारखी अविश्वसनीय घटना घडतेच यावर अनेक सुशितांना भुरळ घातली आहे.

                म्हणूनच आजही विज्ञान तंत्रज्ञानाच्या युगातही भानामती सारख्या घटना भारतभर कुठे ना कुठे घडतांना दिसते नुकतीच वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यातील एका गावात (सामाजिक दायीत्वाच्या भावनेतून समिती नाव गाव याची प्रसिध्दी करत नाही केली तर बहिष्कार, आत्महत्या,हत्या अशा घटना घडतात त्यामुळे) भानामती घडत असतांना मिळालेल्या सुचनेवरून त्या गावातील त्या घरी पोहचून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनसमोर घडलेली भानामती प्रबोधन करुन थांबविली.

                        घरातील वस्तू घराबाहेर दिसने, बाहेरील अनेक आक्षेपार्ह वस्तू,विष्ठा,घाण,घरात आपोआप येणे कपड्यांना आग लागणे,घरातील वस्तु पैसे सोने गायब होणे, अंगावरील कपडे पेट घेणे, घरातील डबे वरून खाली पडणे, जेवणात मिठ पडणे घरातील धान्य व खाण्यापिण्याच्या वस्तू डब्यातून जमिनीवर सांडणे कपडे जळणे,घरावर गोटे येणे किंवा ते घरात येवून पडणे , डोळ्यातून खडे येणे अशा प्रकारे घडणा- या अनेक प्रकाराला भारतीय समाजात मान्यता असून हि भानामती आहे असा समज अजूनही गोरगरीब अशिक्षित यांच्यासह श्रीमंत, उच्च शिक्षित असलेल्यांनमध्ये पण दिसून येते मात्र या सर्व घडणा-या घटनांत घरातील किंवा घराबाहेरील व्यक्तीच हि घटना वेगवेगळ्या त्रासामुळे, घरात,समाजात होत असलेली कुचंबणा,होणारा त्रास, आळशीपणा, कामचुकार पणा प्रेमप्रकरण,भिती यामुळे करीत असते यात शंभर टक्के मानवी हस्तक्षेप असतोच महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने अशा शेकडो भानामतीच्या केसेस संपूर्ण महाराष्ट्रात यशस्वी पणे सोडविल्या आहे.

                 वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यातील या गावातील एका कुटूंबात पण घरात कपडे जळणे,घरावर गोटे येवून पडणे नंतर घरात येवून पडणे, घरातील रोख रक्कम गायब होणे नंतर घर तपासल्या नंतर धान्यात भेटने घरातील धान्य, किराणा जमिनीवर डब्यातून खाली पडणे, अंगावर आपोआपच वस्तू येवून पडणे अशा घटना गेल्या मार्च महिन्यापासून घरात घडत होत्या त्यामुळे संपूर्ण कुटुंब दहशतीत,भितीने जगत होते वेगवेगळे पर्याय करून पाहले पण होणारी भानामती थांबायला नाव घेत नव्हती.

               त्यामुळे काम धंदा मजूरीला जाणेच सर्वांचे बंद झाले घरातील मालकिच्या शेतातही त्यामुळे पेरणी होवू शकली नाही आत्महत्या करण्याचे मनात येवू लागले अनेकदा रात्र जागून काढाव्या लागल्या त्यामुळे प्रकृती बिघडायला लागली घरात पैसा येणे दुरापस्त झाले अशातच आर्थिक तंगी निर्माण होवून कुटुंब कर्जबाजारी झाले अखेर त्यांच्या एका नातेवाईकाला महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य प्रधान सचिव व वर्धा जिल्हात बुवा बाबा यांचा भांडाफोड करण्यात व अशा भानामतीच्या केसेस सोडविण्यास हातखंडा असणारे वर्धेतील गजेंद्र सुरकार यांचा संपर्क मिळवून या भानामती पासून सुटका मिळवून द्यावी अशी विनंती केली.

      लगेचच भानामती केसेस चे कर्दनकाळ म्हणून प्रसिद्ध असणारे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्याध्यक्ष मा माधव बावगे, लातूर यांच्या कानावर ही घटना टाकली व त्यांच्या मार्गदर्शनाखाली गजेंद्र सुरकार, जिल्हा प्रशिक्षण विभागाच्या कार्यवाह डॉ माधुरी झाडे, जिल्हा कार्याध्यक्ष अरुण भोसले, अंधश्रद्धा निर्मूलन पत्रिकेच्या कार्यवाह रजनी सुरकार यांच्यासह घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली  घरातील प्रत्येक व्यक्तीची जबानी घेऊन घटनेच्या मुळाशी पोहचण्याचा प्रयत्न केला अखेर हा प्रकार पुन्हा या घरात घडणार नाही याची शाश्वती त्या कुटुंबातील सर्वांना देवून हि भानामती आपण शंभर टक्के सोडविली हे समाधान घेऊन समितीचे कार्यकर्ते वर्धेला पोहचले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

Below Post Ad