प्रतिनिधि/कोरा (मंगेश राऊत) :
राष्ट्रीय कृषि पत्रकार संघ द्वारा, हँलिपँड प्रदर्शन परिसर सेक्टर अहमदाबाद येथे आयोजित "राष्ट्रीय कृषि साधक, तथा शेतकरी वेदना साहित्य पुरस्कार" समारोह - २०२४ चे वितरण समारंभ गुजरात राज्याचे महामहिम राज्यपाल आचार्य देवव्रतजी, यांचे हस्ते चिखली येथील युवा मनाचे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर जीवंत काव्य तथा साहित्याचे माध्यमातून जनजागृति करणारे शेतीप्रेरक उमेदी तरुण कृषिकवी रंगनाथ तालवटकर यांना शेतकरी वेदनामय साहित्य कविता, तथा जनजागृति कार्य करण्यासाठी स्व.किशोर भुसारी स्मृति युवा साहित्यिक कृषी साहित्य भूषण पुरस्कार २०२४ प्रदान करण्यात आला.
या कार्यक्रमाचे प्रमुख आयोजक महाराष्ट्र शासनाचे कृषि मित्र पुरस्कार प्राप्त मानकरी तथा राष्ट्रीय कृषि पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष गजानन गिरोलकर, गुजरात राज्य कृषि आयोग चेयरमैन डाँ.भरतभाई पटेल,अनाज इंडिया चेयन कमेटी अध्यक्ष विजय हुसूकले, जैन ऐरिगेशनचे मार्किटींग प्रमुख जयकुमार ठक्कर, आदी मान्यवर उपस्थित होते.
मागील एका तपाहून अधिक कालखंडापासून रंगनाथ तलवटकर सामाजिक दायित्व सांभाळत, शेतकरी वर्गात आलेल्या हताशा दूर करुन त्यांचे मध्ये शेतीप्रेरक विचार साहित्याचे कविता लिखानाचे साह्याने करीत शेतकरी वर्गात उत्साहित उमेद जागविण्याचे कार्य तालवटकर हे बहुआयामी व्यक्तिमत्व असून त्यांना कृषी साहित्यि भूषण पुरस्कार हा सन्मान प्रदान करण्यात आला.
हा सन्मान मिळाल्याबद्दल युवा-संस्कार मासिकाचे संपादक प्रदीपकुमार नागपुरकर,राष्ट्रीय कृषी पत्रकार संघ अध्यक्ष गजानन गिरोलकर,मेघश्याम ढाकरे,अमोल झाडे,गजानन गारघाटे,मंगेश राऊत, अरविंद येवले, प्रवीण पंढरे,निशा मेश्राम, प्रशांत शेवडे, मंगेश वाघमारे, चंद्रशेखर बुद्धेवार, पंकज गाठे,धीरज मुन,राजू गिरोलकर,नितीन फुटाणे, मनोहर बोरकुटे,गजानन महल्ले तसेच गावकरी मित्रपरिवार यांनी अभिनंदन केले.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या