Type Here to Get Search Results !

भव्य स्त्री कॅन्सर तपासणी व निदान निःशुल्क शिबिराचे आयोजन

वणी : 

       लायन्स क्लब वणी व वणी लायन्स चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने २ ऑक्टोबर ते ८ ऑक्टोबर २०२४ 'मानवता सेवा सप्ताह' अंतर्गत विविध कार्यक्रम व आरोग्य सेवा शिबिराचे आयोजन करण्यात आले असून दि.६ ऑक्टोबर २०२४ रोजी रविवारी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल देशमुख वाडी वणी येथे महिला कॅन्सर तपासणी व निदान निःशुल्क शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. तरी वणी शहर व परिसरातील महिलांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन लायन्स ट्रस्ट चे अध्यक्ष तथा वणी विधानसभा क्षेत्राचे आमदार श्री. संजीव रेड्डी बोदकुरवार, लायन्स क्लब वणी चे अध्यक्ष लायन राजाभाऊ पाथ्रडकर व प्रोजेक्ट डायरेक्टर सौ. मंजीरी दामले यांनी केले आहे.

               नागपूर येथील नार्ची - नागपूर चॅप्टर, मेनोपाज सोसायटी,अशोशिएशन ऑफ सर्जन, विदर्भ अशोशिएशन ऑफ पॅथालाजीस्ट अँड मायक्रोबायोलाजिस्ट यांचे सहकार्याने आयोजित नागपूर येथील तज्ञ व सुप्रसिद्ध वैद्यकीय चमू व्दारा रविवार दिनांक ६ ऑक्टोबर २०२४ ला सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत कॅन्सर तपासणी व निदान  शिबिराचे आयोजन केले आहे.तसेच शिबिरात हिमोग्लोबिन, ब्लड शुगर व रक्तदाब तपासणी करण्यात येणार आहे. 

               लायन्स स्कूल देशमुख वाडी वणी येथे सकाळी ०८:३० वाजता पासून नाव नोंदणी करण्यात येणार असून इच्छुकांनी नोंदणी करावी असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

🔴 BREAKING NEWS
ताज्या बातम्या थेट WhatsApp वर
📲 आत्ताच JOIN करा

Below Post Ad

file-0000000055fc81f48cd3d96f3a5119ad