प्रतिनिधी/वर्धा (मंगेश राऊत) :
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या जिल्हा व शहर शाखा , वर्धा यांच्या संयुक्त पुढाकाराने सत्यजित प्रमोद लोहवे रा. बरबडी ता जिल्हा वर्धा आणि गौरी दिलीप उघडे रा यवतमाळ या प्रेमविरांचा सत्यशोधकी विवाह वर्धा वर्धन हाट झुनका भाकर केन्द्राचे सभागृह येथे मान्यवरांच्या उपस्थितीत वैदिक पद्धतीने लावून देण्यात आला.
सत्यजित हा आई वडिल नसलेला अनाथ मुलगा तर गौरी हि दिव्यांग दोघांचीही ओळख एका कार्यक्रमात झाली ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले दोघांनीही लग्न करून रितीरिवाज प्रमाणे समाजात उजळ माथ्याने राहायचे ठरवले मुलाला तर आई वडील नाही पण मुलीच्या आई वडील नातेवाईक यांनी प्रखर विरोध केला त्यामुळे सत्यमला विश्वासात घेऊन गौरीने आई वडीलांचे घर सोडले व सत्यमकडे आली अशातच गावातील गुरनुले परिवार यांनी लग्नाची अडचण अशा प्रकारच्या लग्नाला पुढाकार घेऊन कायदेशीर रित्या लग्न लावून देणारे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य प्रधान सचिव गजेंद्र सुरकार यांच्याशी सत्यम व गौरीची भेट करवून दिली सुरकार यांनी दोघांचेही समुपदेशन करुन भविष्यात पुढे येणा-या अडचणी,समस्या समजावून सांगितल्या तर गौरीला तुझ्या परिवाराकडून प्रखर विरोध होवून भविष्यात आई वडिलांचे घराचे दरवाजे बंद होवू शकतात तरी दोघांनीही आंम्ही सुजान व सज्ञान आहो आम्हाला आमचा निर्णय घेण्याचा अधिकार आहे त्यामुळे आंम्ही रितीरिवाजा प्रमाणे लग्न करुन एकत्र राहू ईच्छितो त्यामुळे समाजात आजही घडत असलेल्या ऑनर किलींगच्या घटना पाहता सर्व कायदेशीर कार्यवाही पूर्ण करून दोघांचेही आंतरधर्मिय लग्न मान्यवरांच्या उपस्थितीत लावून देण्यात आले.
या लग्नाचा सर्व विधी पार पाडण्यासाठी राज्य पदाधिकारी प्रकाश कांबळे, जिल्हा प्रधान सचिव सुनील ढाले, जिल्हा कार्याध्यक्ष अरुण भोसले, विवेक वाहिनीच्या जिल्हा कार्यवाह डॉ मंजुषा देशमुख कार्यकर्ती ज्योती भोसले अनिस भोसले यांनी आप आपली भुमिका वठविली यावेळी मंचावर सत्यशोधक समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ अशोक चोपडे, पुस्तक दोस्ती प्रकल्पाचे प्रा सचिन सावरकर महाराष्ट्र अंनिसचे जिल्हाध्यक्ष बाबाराव किटे, प्राचार्य डॉ मोहनिश सवाई, जवान डिफेन्स ॲन्ड स्पोर्ट्स करीअर अकॅडमी वर्धा चे संचालक माजी सैनिक प्रविण पेठे, शिक्षण बचाव समन्वय समितीचे जिल्हाध्यक्ष मनोजकुमार देशमुख,राज्य प्रधान सचिव गजेंद्र सुरकार प्रामुख्याने उपस्थित होते हा लग्न सोहळा पार पाडण्यासाठी सभागृहाचे संचालक गुड्डू देशमुख,मोहन खैरकार व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या