वणी : येथील राजर्षी शाहु महाराज हिंदी विद्यालयात दि. ०५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिन साजरा करण्यात आला. या दिनी विद्यार्थ्यांनी शालेय वेळेत शिक्षकांची भुमीका साकारली.
मुख्याध्यापक अभय पारखी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात सर्वप्रथम डाॅ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेला सौ. अनिता टोंगे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
मुख्याध्यापक अभय पारखी सर यांनी शिक्षक म्हणुन काम केलेल्या विद्यार्थ्यांचे कौतुक केले. तसेच शिक्षक दिनाची माहीती देऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे संचालन शप्रतिश लखमापुरे तर आभार प्रदर्शन गंगारेड्डी बोडखे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक तथा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अथक प्रयत्न केले.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या