प्रतिनिधी/ समुद्रपूर (मंगेश राऊत) :
समुद्रपुर तालुक्यातील देरडा या छोट्याश्या गावात मुरतकर परिवाराकडून १२५ वर्षाचा महालक्ष्मी पूजनाचे वारसा जपत इतरांसाठी एक सामाजिक भावना जोपासत संपूर्ण परिवारातील सदस्या आणि नातलग यांच्या उपस्थितीत सानंद संपन्न झाला.
महालक्ष्मी पूजनाच्या १२५ व्या वर्षा निमित्ताने परिवारातील डॉ सुरेश मुरतकर, डॉ समीर मुरतकर व डॉ मृणाल मुरतकर यांनी गावातील लोकांचे मोफत आरोग्य तपासणी शिबिर घेत सामाजिक भावना जोपासली.
गावातील नागरिकांची आरोग्य तपासणी करून एक आगळ्या वेगळ्या पद्धतीने महालक्ष्मी पुजन संप्पन झाले यात लागणाऱ्या औषधांचा पुरवठा मुरतकर परीवारातील सुनील मुरतकर व धीरज मुरतकर यांनी रुग्णासाठी औषधांचा पुरवठा केला.
त्याचप्रमाणे गावातील व परिवारातील सदस्यांनी वेगवेगळे खेळ खेळून आनंद साजरा केला. तसेच या प्रसंगी मुरतकर परिवारातील चार पिढ्या उपस्थित असल्या मुळे परिवारातील सदस्यांनी मनोगताच्या माध्यमातून परिवारातील महालक्ष्मी स्थापने पासून एकशे पंचवीस वर्षाच्या प्रवासाला उजाळा दिला.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या