प्रतिनिधी/ वर्धा (मंगेश राऊत) :
वर्धा शहरात महालक्ष्मी पुजनाचा उत्साह वर्धक वातावरण सुरू असतांना वर्धा विधानसभेचे आमदार डॉ पंकज भोयर यांच्या मसाळा येथील नविन निवासस्थानाच्या अंगणात चार विषारी सापांपैकी एक जहाल विषारी असणारा घोणस ( रसेल वायपर)ज्याला ग्रामीण भागात परड, सोन्यापरड, बहिरा असे नावाने ओळखला जातो हा साप मोठ्या महत प्रयत्नाने सुरक्षित पकडून निसर्गाच्या सान्निध्यात लगेच सर्वांसमक्ष सोडून देण्यात आला.
आमदार डॉ. पंकज भोयर व परिवारातील सर्व घरात आराम करत असताना पाळीव असलेला कुत्रा जोरजोराने भुंकत होता तो का भुंकतो हे पाहण्यासाठी आमदार बाहेर आले तर कुत्रा जहाल विषारी घोणस सापाला पाहून भुकंत होता लगेच आवारात काम करत असलेल्या माणसाला आवाज देवून कुत्र्याला बांधायला सांगितले व त्वरीत विदर्भ सर्पमित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष व सर्प अभ्यासक गजेंद्र सुरकार यांना फोन करून तातडीने येण्याविषयी म्हटले लगेचच घटनास्थळी धाव घेऊन पाहणी करता साप हा इलेक्ट्रिक डिपीच्या आत मध्ये बसलेला दिसला त्याला काढण्याचा बराच प्रयत्न केला असता रागाने जोर जोराने आवाज काढून शरीर फुगवून भिती दाखवू लागला हे रूद्ररूप पाहून आमदार डॉ पंकज भोयर यांच्या सह जमा झालेले लोकांच्या अंगावर काटा उभा राहून सर्वच घाबरले गजेंद्र सुरकार यांनी स्वता:हाला सुरक्षित ठेवत महत प्रयत्न करून अखेर दिड तासाच्या प्रयत्नानंतर जहाल विषारी घोणस सापाला भरणीत बंद करून लगेच निसर्गाच्या सान्निध्यात सुरक्षित सर्वा समक्ष सोडून दिले.
हा साप दिसायला सोणेरी रंगाचा शरिरावर गोल ठिपक्यांच्या तिन माळा,तोंड त्रिकोणी माने जवळ छोटा तर पोटाचा भाग जाड व शेपटीकडे निमुळता असे शरीर असून शरीर खाली वर फुगवून कुकरच्या शिटी सारखा आवाज काढून आपले अस्तित्व अधोरेखित करतो किंवा त्याला डिवचल्यास असे करतो.
हा साप कोणत्या क्षणी उंच उडी घेऊन क्षणात किती वेळा दंश करेल हे अनेकदा सर्प मित्रांना,सर्पतज्ञांनाही अंदाज येत नाही त्यामुळे याला हाताळताना बरीच रिक्स घ्यावी लागते गारोडीही या सापाला भितो त्यामुळे हा साप कधीच गारोडीकडे पाळलेला नसतो हा साप चावल्यास चावल्या जागी काही वेळातच वेदना सुरू होवून त्या अंगभर पसरते काही वेळाने चावल्या ( दंशाच्या) जागी सुज येते ती अंगभर पसरते त्यावर मोठाले फोड येतात त्यामुळे सापाच्या अंगावर जसे चट्टे दिसतात तसे अंगावर आले असे वाटते, त्यानंतर तोंडातून थुंकीव्दारे व लघवीतून अनेकदा रक्त येते उपचार घेण्यास उशीर झाल्यास दोन्ही किडण्या निकामी होऊन मृत्यू होतो २१दिवस पर्यंत माणूस या सापाच्या दंशानंतर मृत्यू पावला असे उदाहरण मेळघाट परिसरात पद्मश्री डॉ रवि कोल्हे यांना आढळून आले तर या जातीचा साप जगविख्यात सामाजिक कार्यकर्ते पद्मभूषण डॉ प्रकाश आमटे यांना चावल्यानंतर अनेक दिवसांच्या उपचारानंतर अनेक डॉक्टरांच्या प्रयत्नाने त्यांचा जिव वाचविण्यात यश आले असा हा जहाल साप आहे हा साप ज्या जागेतून गेला ती जागा ओलांडून गेल्यास किंवा या सापाचे लाळ ओलांडून पुढे गेल्यास पाय सुजतो असा गैरसमज आहे असे काहीही होत नाही तर एखाद्या जहरी किडा चावल्यास पाय सुजू शकतो तिव्र वेदना व ती जागा सुजल्यासच घोणस हा विषारी साप चावला असे समजावे. जेवढ्या लवकर सरकारी दवाखान्यात जाता येईल तेवढ्या लवकर जावे उशीर झाल्यास वेदनादायक मृत्यूला सामोरे जावे लागते प्रत्येक सरकारी पि.एस.सी.सेन्टर, ग्रामिण रुग्णालयात, सरकारी रुग्णालय येथे या सापासह चारही विषारी सापाच्या दंशावर प्रती सर्पविष (ॲन्टीस्नेकव्हेनम) उपलब्ध असते. त्यामुळे मुळेच आपला व दुस-याचा मौल्यवान जिव वाचू शकतो बा-या म्हणणे, मंत्र तंत्राचा उपचार करणे, खडा जखमेवर ठेवणे, गावठी वन औषधी घेणे, सापाच विष उतरविणे, दंशाच्या जागी चिरा देणे, तोंडाने जखमेतून विष ओढणे आदी अवैज्ञानिक उपचार करू नये यामुळे जिवाला धोका होवून प्रसंगी अपंगत्व येवू शकते तर असा उपचार केला गेल्यास जादुटोणा विरोधी कायदा अन्तर्गत उपचार केल्यास सहभागी सर्वांवर गुन्हा दाखल होवून सिध्द झाल्यास पाच हजार ते पन्नास हजार रुपये दंड व सहा महिने ते सात वर्ष शिक्षा होते अशी माहिती गजेंद्र सुरकार यांनी दिली आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या